sangli crime news : सांगलीत कर्ज घेऊन बँकेची दोन कोटीची फसवणूक सोलापूर आणि सांगलीतील सात जणांवर गुन्हा दाखल. : डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या मार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यासाठी ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजने अंतर्गत सांगलीतील एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण न करता कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
sangli crime news : सांगलीत कर्ज घेऊन बँकेची दोन कोटीची फसवणूक सोलापूर आणि सांगलीतील सात जणांवर गुन्हा दाखल.
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी तब्बल 1 कोटी 98 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी एचडीएफसी बँकेचे अधिकारी रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणार्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर फसवणुकीची घटना हि दि. 23 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दि. 21 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली.
मुकुंद हणमंत जाधवर (रा. बालवाड जि. सोलापूर), स्वप्नाली मुकुंद जाधवर (वय 27 रा. बालवाड जि. सोलापूर), सखुबाई हणमंत जाधवर (वय 61 रा. बालवाड जि. सोलापूर) विजय शैलेंद्र कराड (वय 31 रा. भालगाव जि. सोलापूर), राजाराम विठ्ठल खरात (वय 48 रा. एरंडोली जि. सांगली), अजित विष्णू दळवी (वय 48 रा. बेडग) आणि लता विठ्ठल जाधव (वय 38 रा. पायाप्पाचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या मार्फत संचालक व सीईओ संशयित मुकुंद जाधवर यांच्यासह इतर सात संशयितांनी सांगलीतील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजने अंतर्गत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजींग प्रकल्प उभा करण्यासाठी कर्ज मंजूर करून घेतले.
सदरचे कर्ज हे कर्ज घेणार्या कंपनीने सुचवलेल्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मूव्हर्स कोंडावा पुणे, एस.जे.एम.एम. असोसिएट्स अँड मल्टी सर्व्हिसेस प्रा. ली. विजयनगर सांगली आणि शुभ गणेश ऍग्रो इंडस्ट्रीज बेडग या तीन व्हेंडर कंपन्यांच्या बँक खात्यावर मंजूर कर्जाची रक्काम एचडीएफसी बँकेने पाठवली.
सदर प्रकल्प हा तीन महिन्यात पूर्ण करून त्याबाबतची कागदपते बँकेला जमा करणे गरजेचे होते. ते वेळेत पूर्ण न करता तसेच जी जमीन तारण ठेवली आहे त्यावर प्रकल्प उभा करणे बंधनकारक असूनही तारण ठेवलेल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा केला नाही आणि बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील केली नाही. सदर फसवणुकीची बाब निदर्शनास येताच एचडीएफसी बँकेचे अधिकारी कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्या प्रकरणी संशयित सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



