sangli crime news : सांगलीत निर्दयीपणे बांधून गाईंची वाहतूक करणारा ट्रक पकडला : : सांगली : शहरातील काळी खण परिसरात अवैधरित्या 16 गाई व एका म्हैस टेम्पोमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगलीतील गोरक्षकांनी जनावरांसह गाडी थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणत जनावरांची सुटका केली. याप्रकरणी अस्लम सिकंदर खाटीक (वय 40, रा. गोर्डे चौक, आष्टा, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विनायक सदाशिव येडके (वय 37, रा. गावभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली.
sangli crime news : सांगलीत निर्दयीपणे बांधून गाईंची वाहतूक करणारा ट्रक पकडला
16 गाईंची सुटका : चालकावर गुन्हा दाखल.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विनायक येडके हे फायनान्स कंपनीकडे कर्जवसुलीचे काम करतात. ते गोरक्षक संघटनेचे सदस्य आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजता सांगली कॉलेज कार्नर येथे बोजा असलेले वाहनांचा शोध घेत असताना टेम्पो (एमएच 10, सीआर 2675) काळीखण परिसरात थांबविला. टेम्पोच्या पाठीमागील ताडपदरी बाजूला करताच गाडीत जर्सी गाई व म्हैस होती. गाडीत 16 गायी व एक म्हैस दाटीवाटीने कोंबून भरलेली निदर्शनास आली.
गोरक्षक ओंकार माळी, सचिन सुर्यवंशी, रोहित पाटील, शिवतेज सावंत, राहूल माने, सुजल चव्हाण, चिन्मय शेट्टी, राहूल कोळी, दीपक बावकर, सुमीत जाधव, आकाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जनावरांसह टेम्पो विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आला. पोलिस व गोरक्षकांनी जनावरांची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून जनावरांची तपासणीही करण्यात आली. याप्रकरणी अस्लम सिकंदर खाटीक (वय 40, रा. गोर्डे चौक, आष्टा, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.
गोशाळासह महापालिकेचे हात वर
सांगलीत 17 जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडल्यानंतर जनावरे पोलिस मुख्यालयात बांधण्यात आली. गोरक्षकांनी सांगलीतील गोशाळा व महापालिकेशी संपर्क साधून जनावरे ताब्यात घेण्याची विनंती केली. महापालिकेच्या कोंडवाड्यात जनावरांची व्यवस्था करावी, यासाठी अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला. पण कोणीच त्याला दाद दिली नाही. शेवटी सर्व जनावरे कराड येथील भगवान महावीर गोशाळा येथे रवाना करण्यात आली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



