rajkiyalive

sangli crime news : खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा कालव्यात बुडून मृत्यू

कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी):-

sangli crime news : खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा कालव्यात बुडून मृत्यू : कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा हरोली गावच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुमारास घडली. वसंत तुकाराम पाटील (वय 80 ) व पमाबाई वसंत पाटील (वय 75) दोघेही रा.खरशिंग असे बुडून मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

sangli crime news : खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा कालव्यात बुडून मृत्यू

पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,खरशिंग येथील वसंत तुकाराम पाटील (वय 80) व पमाबाई वसंत पाटील (वय 75 ) हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावच्या हद्दीतील म्हैशाळ योजनेच्या कालव्यात शनिवारी (दि.17) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेले होते.परंतु ते सायंकाळ पर्यंत घरी परत आले नाहीत.

सायंकाळपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकानी आसपास शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत.नातेवाईक आणि ग्रामस्थ म्हेशाळ योजनेच्या कालव्याजवळ जावून शोध घेवू लागले. त्यावेळी हरोली गावच्या हद्दीत म्हैशाळ कालव्याच्या वरच्या बाजूला चप्पल व कपडे पडलेले दिसले.
ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर हरोली गावच्या हद्दीत शनिवारी रात्री उशिरा सौ. पमाताई पाटील यांचा मृतदेह कालव्यात आढळला.

तर रविवारी सकाळी बोरगावच्या हद्दीत वसंत पाटील यांचा एका वस्तीजवळून गेलेल्या म्हैसाळ कालव्यात मृतदेह आढळला.
या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.दरम्यान पती-पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची गावात माहिती मिळतात गावातून हळहळ व्यक्त होत होती.या घटनेची नोंद पोलिसात झाली.

( फोटो ओळी :- मयत दोन फोटो)

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज