sangli crime news : लक्ष्मी फाट्यावर अपघातात सांगलीवाडीचा दुचाकीस्वार ठार : सांगली : सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मीफाटा येथे दुचाकी आणि मालवाहतूकीची समोरासमोर धडक झाल्याने तरूण ठार झाला. अनिल अरूण मोहिते (36, सांगलीवाडी) असे मृत तरूणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी हा अपघात झाला.
sangli crime news : लक्ष्मी फाट्यावर अपघातात सांगलीवाडीचा दुचाकीस्वार ठार
सांगली-पेठ रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरीच वाहतूक सुरू होती. त्यामुळे हा अपघात झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत मोहिते हे एका वाहन कंपनीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आज सकाळी दुचाकीवरून आष्टा येथे कामानिमित्त गेले होते. त्यानंतर दुपारनंतर ते पुन्हा सांगलीवाडीकडे येत होते. त्यावेळी लक्ष्मी फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू होती.
त्यावेळी सांगलीतून आष्ट्याच्या दिशेन निघालेले मालवाहतूक (एमएच 12 जेएफ 7388) समोरून आला. त्यावेळी मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मृत घोषित केले.
sangli-crime-news-biker-from-sangliwadi-killed-in-accident-at-laxmi-phata
दरम्यान, मोहिते यांच्या पश्चात आई-वडिल, एक मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईच्या ताब्यात देण्यात आला. मोठी गर्दी हॉस्पिटल परिसरात होती. या आठवड्यात आष्टा येथे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर आज आणखी एका तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभिर्य ओळखून ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी तातडीने रस्त्याच्या कंत्राटदारांना बोलावून घेतले. रस्ता दुभाजक आणि कामाचे फलक प्रत्येक ठिकाणी लागले पाहिजेत, अशा सक्त सूचना दिल्या.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



