rajkiyalive

SANGLI CRIME NEWS : घरफोडी करणारा चोरटा जेरबंद : १७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त. 

sangli-crime-news-burglar-thief-jailed-five-crimes-revealed-17-lakh-43-thousand-items-seized

सांगली :

SANGLI CRIME NEWS : घरफोडी करणारा चोरटा जेरबंद : १७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त.  : कवलापूर, विटा आणि संजयनगर परिसरात घरफोडी करून दागिने विक्री करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगेश येताळा भारते (वय २७ रा. मधाळमुठी ता. खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगलीत सदरची कारवाई केली. दरम्यान, संशयित भारते याचे अन्य दोन साथीदार असून सध्या ते पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

SANGLI CRIME NEWS : घरफोडी करणारा चोरटा जेरबंद : १७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते.
यावेळी पथकातील अनिल ऐनापुरे, प्रकाश पाटील आणि हणमंत लोहार यांना माहिती मिळाली कि, संशयित भारते हा चोरीचे दागिने विकण्यासाठी सांगलीतील बोर्ड कॉलनी येथे येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा रचून दुचाकीवर थांबलेल्या संशयित भारते याला ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या मोपेड दुचाकीची झडती घेतली असता डिक्की मध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळाले. सदरच्या दागिन्यांबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले. त्याच्या ओळखीचे असलेल्या बबलूसिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी (दोघे रा.पुणे) यांनी काही दिवसांपूर्वी विटा, कवलापूर आणि संजयनगर मध्ये घरफोडी करून चोरले होते. सदरचे दागिने विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्याचे सांगितले.
यावेळी त्याच्याकडून सोन्याची बोरमाळ, मंगळसूत्र, चेन, गंठण, कर्णफुले, वेल, रिंग, बदाम, वेढण, नथ, झुबे, ब्रेसलेट, नेकलेस असे एकूण १६ लाख ६६ हजारांचे सोन्याचे दागिने, अडीच हजारांचे चांदीचे दागिने आणि ७५ हजारांची दुचाकी असा एकूण १७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, हणमंत लोहार, दरिबा बंडगर, सागर लवटे, अमोल ऐदाळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, पुण्यातील त्या दोघा संशयितांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज