rajkiyalive

SANGLI CRIME NEWS : स्वतःच्याच घरात घरफोडीचा केला बनाव : वांगीतील व्यक्तीस केली अटक  

सांगली :

SANGLI CRIME NEWS : स्वतःच्याच घरात घरफोडीचा केला बनाव : वांगीतील व्यक्तीस केली अटक   : १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.  : भाच्याने विश्वासाने ठेवण्यास दिलेली रक्कम त्याला परत द्यावी लागू नये म्हणून एका व्यक्तीने स्वतःच्याच घरात घरफोडी झाल्याचा बनाव केला होता. याचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने फिर्यादी असलेल्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून दहा लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किरण सीताराम कुंभार (वय ४२ रा. वांगी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना हि मंगळवार दि. १६ जुलै रोजी घडली होती. 

SANGLI CRIME NEWS : स्वतःच्याच घरात घरफोडीचा केला बनाव : वांगीतील व्यक्तीस केली अटक  

याबाबत अधिक माहिती अशी कि, संशयित सीताराम कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह कडेगाव तालुक्यातील वांगी गावातील सुतार मळा परिसरात राहतात. संशयित कुंभार यांनी त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचा बनाव करून १५ लाख २० हजार रुपये चोरीला गेल्याची फिर्याद चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहिती द्वारे घरातील चोरी झालेली रक्कम हि किरण कुंभार यांनीच लपवून ठेवत बनाव केल्याची माहिती मिळाली. यानंतर पथकाने तातडीने कुंभार यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, सदरची रोख रक्कम हि त्यांच्या भाच्याने थोड्या दिवसांसाठी विश्वासाने त्यांच्याकडे ठेवण्यास दिली होती.
परंतु त्यातील काही रक्कम हि कुंभार यांनी खर्च केली. त्यामुळे सदरची रक्कम हि भाच्याला परत द्यावी लागू नये तसेच इतर रक्कम हि त्यांना वापरण्यास मिळेल यासाठी स्वतःच्याच घरी घरफोडीचा बनाव करून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे सांगितले.
यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी कुंभार यांनी त्यांच्या घरी लपवून ठेवलेली दहा लाख ६० हजारांची रोकड जप्त करत कुंभार यांना अटक करून त्यांना चिंचणी वांगी पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, श्रीधर बागडी, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, सुरज थोरात, रोहन घस्ते यांच्या पथकाने केली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज