sangli crime news : तानंग फाट्यावर क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या बसचा अपघात : 11 विद्यार्थी जखमी : मिरज – पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एन.एल.01 ए.सी.3322 या क्रमांकाचा चौदा चाकी लोखंडी ऍगल घेवून जाणारा ट्रक आणि एम.एच.40एक्यू 6368 या क्रमांकाची एसटी याचा अपघात झाला असून या बसमध्ये 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींमध्ये कवठेमहांकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहेत.
sangli crime news : तानंग फाट्यावर क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या बसचा अपघात : 11 विद्यार्थी जखमी
एस.टी.बस चालक अर्जुन कृष्णा एरंडे (वय-35 वर्षे धंदा- रा- मु. रेवेवाडी, पो-हुन्नुर ता-मंगळवेढा), यांनी मिरज ग्रामीण पोलिसात ट्रक चालकाच्या विरोधात फिर्याद दिली असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. प्रवाशांवर त्यांच्यावर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

कवठेमहांकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थी हे मिरजेत क्रीडा स्पर्धेसाठी आले होते. क्रिडा स्पर्धा संपल्यानंतर सांगली-जत याबसमध्ये बसले होते. तानंग फाट्याजवळ आल्यानंतर चौदा चाकी ट्रक हा तानंगकडे निघाला असता ट्रकने एस.टी. जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. एस.टी.मधील शिटचे लोखंडी ऍगल, तसेच खांब डोक्याला हाताला जोरात बडविले. या अपघातामुळे बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. यामध्ये कवठेमहांकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमी प्रवाशी, विद्यार्थ्यांवर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. ट्रक चालक स्वप्नील पंडीतराव मुळे (रा.नांदेड) यास ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सांगली ते जत ही बस सांगलीकडे मिरज पंढरपुर रोडने जतकडे जात असताना सकाळी 07.45 वा चे सुमारास तानंग फाटा, येथे मालगाव कडून मालट्रक भरधाव वेगाने येवुन बसचे उजवे बाजुस जोराची धडक दिली. बसचे उजवे बाजुचा पत्रा फाटलेला दिसला. बसमधील 18 प्रवासी जखमी झालेले दिसल्याने वाहक चिदानंद पारसे यांनी डायल 108 ऍम्ब्युलन्सला व मिरज आगार येथे फोन करुन अपघाताची माहीत दिली.

1) रुपाली मृत्युंजय हिरेमठ, रा. मनेरी गल्ली सांगोला, जि. सोलापुर 2) रोहिणी मल्लीकार्जुन साळुंखे, रा. विजयनगर सांगली 3) धनश्री प्रमोद कांबळे, रा. सांगलवाडी, ता. मिरज 4) अधिराज आनंद सुर्वे, 5) अभिजीत अनिल करपे, 6) सुमित शिवाजी बनसोडे, 7) समर्थ शैलेश माने, 8) प्रज्वल लहु काळे, 9) राहुल सुनिल कांबळे 10) अर्पन राजेश कांबळे 11) शुभम रमाकांत कांबळे, 12) निखील रमाकांत सपकाळ, 13) संस्कार विकास कांबळे, 14) प्रेम उमेश माघाडे 15) कृणाल विनोद साबळे, 16) विराज विशाल नडोनी, सर्व रा. शासकीय निवाशी शाळा, कवठेमहांकाळ, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली 17) मृत्यजय सिदमलया हिरमेठ रा- मनेरी सांगोला जि- सोलापुर, 18) आरमान शाहीद मुलाणी रा- विश्रामबाग सह्याद्रीनगर सांगली अशी जखमींची नावे आहेत. ट्रक चालकाच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दैवबलवत्तर म्हणून प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अन्यथा मोठी जीवतहानी झाली असती. या अपघाताची माहिती कवठेमहांकाळ येथीर शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापकांना समजल्यानंतर त्यांनी मिरज शासकीय रूग्णालयातील विद्यार्थ्यांवर होणार्या उपचाराबाबत माहिती घेतली. विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचार करून पाठविण्यात काम सुरू होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



