rajkiyalive

sangli crime news : पगार काढण्यासाठी लाच मागणार्‍या शिक्षकासह क्लार्कवर गुन्हा दाखल : 1 लाख 10 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न.

sangli crime news : पगार काढण्यासाठी लाच मागणार्‍या शिक्षकासह क्लार्कवर गुन्हा दाखल : 1 लाख 10 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न. : सांगली : एका शिक्षण संस्थेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करणार्‍या शिक्षिकेचा दोन वर्षांचा पगार काढण्यासाठी सहा टक्के लाच मागणार्‍या शिक्षक आणि क्लार्कवर लाचलुचपतने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सोनी येथील हिंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असणार्‍या न्यू इंग्लिश स्कुलचे शिक्षक उमेश मारुती बोरकर (वय 36 रा. कवठेएकंद) आणि ज्युनिअर क्लार्क युवराज मनोहर कांबळे (वय 56 रा. बेडग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार संबंधित शिक्षिकेच्या पतींनी लाचलुचपत विभागाकडे केली होती.

sangli crime news : पगार काढण्यासाठी लाच मागणार्‍या शिक्षकासह क्लार्कवर गुन्हा दाखल : 1 लाख 10 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या पत्नी या सांगलीतील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि विलिंग्डन कॉलेज येथे संस्कृत विषय शिकवण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. सदर दोन्ही आस्थापनाकडील सुमारे दोन वर्षाचे एकूण 19 लाख 45 हजार 710 रुपये रकमेचे एकूण तीन पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासन यांनी मंजुरीकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पे युनिट येथे पाठवले होते.

दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणाली प्रमाणे केलेल्या पडताळणी केली यात. संशयित उमेश बोरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन पगार बिलाची एकूण रक्कम 19 लाख 45 हजार 710 रुपये च्या सहा टक्के इतक्या रकमेची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी केलेल्या पडताळणीमध्ये बोरकर यांनी वर पगार बिले पे युनिट कार्यालयातून मंजूर करून आणून देतो असे सांगून 1 लाख 10 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याचवेळी संशयित कांबळे यांनी तक्रारदार व बोरकर यांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊन बोरकर यांना लाच देण्याकरिता तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक उमेश पाटील, पोलिस अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, पोपट पाटील यांच्या पथकाने केली.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज