rajkiyalive

sangli crime news : सांगलीत भरदिवसा आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोकड, दागिने लंपास

sangli crime news : सांगलीत भरदिवसा आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोकड, दागिने लंपास गुल्लरच्या सहाय्याने दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी मागील सीटवरील बॅगा लांबविल्या. सांगलीतील जिल्हा परिषदसमोर आणि स्टेशन चौकात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह 30 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली आहे.

sangli crime news : सांगलीत भरदिवसा आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोकड, दागिने लंपास

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील जलभवनलगत गुळवणी नावाच्या व्यक्तीने कार पार्क केली. जवळच्या दुकानात ते खरेदीसाठी गेले होते. रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी गुल्लरच्या सहाय्याने त्यांच्या गाडीची काच फोडली. मागील सीटवर ठेवलेल्या दोन बॅगा घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर काही वेळातच स्टेशन चौकातील एका मोबाईल शॉपीसमोर डॉ. अपर्णा हेमराज यादव यांची गाडी फोडली. यादव या एका हॉटेलसमोर गाडी पार्क करून टेलरिंग दुकानात गेल्या होत्या. क्षणार्धात चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये अर्धा तोळे सोने, दहा हजाराची रोकड असा एकूण 30 हजाराचा मुद्देमाल लांबविला. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पण चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

गेस्ट हाऊसजवळ बॅगा टाकल्या…

चोरटे रिक्षातून आल्याची माहिती समोर आली आहे. गुल्लरच्या सहाय्याने क्षणार्धात काच फोडून ते सांगली-मिरज रस्त्याने निघून गेले. जिल्हा परिषदेजवळ कारमधून चोरलेल्या बॅगा गेस्टहाऊस चौकात टाकल्या. पोलिसांनी याची माहिती मिळताच बॅगाची तपासणी केली. बॅगेत कागदपत्रे व कापडे होते. तीन ते चार चांगले कपडे मात्र चोरट्याने काढून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंतरराज्य टोळीची शक्यता…

कारच्या काचा फोडून बॅगा लांबविणार्या टोळीने मंगळवारी शहरात धुमाकूळ घातला. ही टोळी तामिळनाडू अथवा आंध्रप्रदेशमधील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. अशाच घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्याची माहिती समोर आली आहे. या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रे फिरविली आहेत

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज