sangli crime news : चेन स्नॅचिंग करणार्या टोळीचा पर्दाफाश : चौघांना केली अटक : सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, विटा आणि इस्लामपूर येथे एका महिलेच्या सांगण्यावरून चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटणार्या तसेच गळ्यातील दागिने चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी करणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
sangli crime news : चेन स्नॅचिंग करणार्या टोळीचा पर्दाफाश : चौघांना केली अटक
गुन्हा करणार्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे गुन्हे उघड करत 5 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विटा ते कडेपूर या मार्गावर सदरची कारवाई केली. अभिषेख जगन्नाथ जाधव (वय 23), निरंजन बळवंत कुरळे (वय 22), सौरभ महादेव इंगवले (वय 22 तिघे रा. देवराष्ट्रे) आणि सुलताना बालेखान मुलाणी (वय 43 रा. कडेपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शस्त्राचा धाव दाखवून लुटणार्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हणमंत लोहार आणि प्रमोद साखरपे यांना माहिती मिळाली कि, विटा ते कडेपूर रोडवर दुचाकीवरून तिघे जबरी चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी सापळा लावून संशयित अभिषेख जाधव, निरंजन कुरळे आणि सौरभ इंगवले यांना ताब्यात घेतले.
त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ दागिने मिळाले.
दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, बालेखान मुलाणी हिच्या सांगण्यावरून कडेपूर येथील लवंग मळा येथे शेतात काम करणार्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर इस्लामपूर येथील पेठ, विटा येथील कार्वे आणि देवनगर याठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली आहे.
यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 लाख 35 हजारांचे दागिने, 70 हजारांची दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण 5 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना पुढील चौकशीसाठी कडेगाव आणि इस्लामपूर पोलीस ठाण्यांकडे सुपूर्त करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सुरज थोरात, सोमनाथ पतंगे, सुशांत चिले, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे यांच्या पथकाने केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



