rajkiyalive

sangli crime news : सांगलीवाडीत मगरीचे पिल्लू विकणार्‍यास बदडले

sangli crime news : सांगलीवाडीत मगरीचे पिल्लू विकणार्‍यास बदडले : सांगली : मच्छीमारीसाठी गेलेल्या तरूणाच्यात जाळ्यात मगरीचं पिल्लू अडकलं. त्याने ते पिल्लू घरी आणलं. त्या पिल्लूला बाटलीत ठेवून चक्क सातशे रूपयांना विकण्याचा प्रयत्न करत होता. सांगलीवाडीतील सजग नागरीकांनी त्याला अडवलं. त्याला चांगलाच चोप दिला अन् त्याच्याकडून मगरीचं पिल्लू काढून घेतलं. तोवर एकाने वनविभागाच्या भरारी पथकास माहिती दिली. वनविभागाने घटनास्थळी तत्काळ दाखल झाले अन् पिल्लू ताब्यात घेतले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान,याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.

sangli crime news : सांगलीवाडीत मगरीचे पिल्लू विकणार्‍यास बदडले

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगलीवाडीतील एका मंदिराजवळ ऊस तोडी मजूर राहतात. त्यातील एकजण आज नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या जाळ्यात काही मासे आणि मगरीचं पिल्लू अडकले. त्याने ते मगरीचे पिल्लू पिशवीत घालून घरी आणले.

मासे घरी दिले आणि मगरीचं पिल्लू विकण्यासाठी परिसरात आला. त्यावेळी काही सजग नागरीकांना ही बाब समोर आली. तो धुंद अवस्थेत असल्याने त्याला पिल्लू दाखवण्याची मागणी केली. पिल्लू दाखवले त्यावेळी नागरीकांनी त्याला पकडून ठेवले. संतप्त नागरीकांनी बदडलेही.

त्यावेळी माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांची माहिती काही प्राणीमित्रांनी दिली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनपाल तुषार भोरे, वनरक्षक गणेश भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मगरीचे पिल्लू ताब्यात घेतले. संबंधिताचा शोधही घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर मगरीचे पिल्लू सायंकाळी उशीरा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाची तत्परता आणि नागरीकांच्या सतर्कता यानिमित्ताने दिसून आली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज