सांगली :
sangli crime news : नागज फाट्याजवळ महामार्गावर 31 लाखांचा गुटखा जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई : दोघांना अटक. : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 31 लाखांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. कारवाईत 15 लाखांची मालवाहतूक करणारा ट्रक आणि 5 लाखाची चारचाकी ताब्यात घेण्यात आली. रायाप्पा कप्पान्ना पुजारी (वय 35, रा. उमराणी, ता. चिक्कोडी, राज्य – कर्नाटक) आणि सुनील ज्ञानोबा शिंदे (वय 42, रा. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
sangli crime news : नागज फाट्याजवळ महामार्गावर 31 लाखांचा गुटखा जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई : दोघांना अटक.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास सांगली ते सांगोला जाणार्या रस्त्यावर एका मालवाहतूक ट्रकमधून (क्र. केए 22 डी. 7425) बेकायदा सुगंधी तंबाखू आणि गुटखा चोरुन विक्री करण्याकरिता वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवार दि. 20 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता. काही वेळाने रस्त्यावरुन संबंधित मालवाहतूक ट्रक जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिसांनी ट्रक चालकास थांबवून वाहनात काय आहे याबाबत विचारणा केली असता ट्रकचालक रायाप्पा पुजारी याने सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असल्याचे सांगितले. तसेच सदर साठा कर्नाटक राज्यातील कुडची येथून भरला असून तो पंढरपूरला घेवून जाणार असल्याचे सांगितले. रस्ता दाखविण्यासाठी पुढे थोड्या अंतरावर एक लाल रंगाची चारचाकी (क्र. एमएच 04 एफए 0102) असल्याचे संशयित रायाप्पा पुजारी याने सांगितले. पोलिसांनी पुढे जावून पाहिले असता रस्त्याकडेला सदर चारचाकी थांबलेली आढळली. पोलिसांनी त्याचा चालक असलेल्या संशयित सुनील शिंदे याकडे चौकशी केली असता त्याने चिक्कोडी येथील आण्णा (पूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही) यांनी ट्रकमध्ये भरुन दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी सुगंधी तंबाखू, गुटख्यासह दोन्ही वाहने जप्त केली. सदरच्या कारवाईत पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सहा. पोलीस निरिक्षक पंकज पवार, पोलीस कर्मचारी गुंडोपंत दोरकर, अमर नरळे, दर्याप्पा बंडगर, सोमनाथ गुंडे आदींनी सहभाग घेतला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात संशयित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.