खून, दरोड्याच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक
*वैभव पतंगे, सांगली*
sangli crime news : रक्ताने माखतायेत अल्पवयीनांचे हात* – *तरूणाईच्या डोक्यात शिरतेय रिल्सची झिंग*: सांगली शहरात गेल्या काही दिवसात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अल्पयीन मुलांचा सहभाग हा लक्षणीय आहे. अल्पवयातच सोशल मिडीयावरील भाई -गिरीचे रिल्सची झिंग तरुणांईच्या डोेक्यात शिरताना दिसत आहे. शहरातील एका खून प्रकरणामध्ये चार अल्पयीन मुलांनी ‘मै हूँ डॉन…’ या गाण्यावर आधी रिल्स काढली. नंतर कोयता व चाकुने सपासप वार करत एका तरूणाचा खून केला. यापूर्वी हरिपूर रोडवरील खूनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून तरूणाीईच्या डोक्यात नेमके काय शिजते आहे असा सवाल उपस्थित होत आहे. याला भरीस-भर म्हणून विटा येथे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणारा साठा आढळल्याची बाब गंभीर आहे.
sangli crime news : रक्ताने माखतायेत अल्पवयीनांचे हात* – *तरूणाईच्या डोक्यात शिरतेय रिल्सची झिंग*
संपुर्ण जगभरात युवा राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. जगातील सर्वाधिक युवक ज्या भारतात राहतात त्या भारतातील युवा पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्याने व गुन्हेगारीने ग्रहण लावले आहे. उद्याचा सम्ध्द आणि बलशाली समाज उभारणीचे आधारवड म्हणून ज्या हातांकडे पााहिले जाते,तेच हात आज गून्हेगारीच्या विघातक पाशात गुंतले जात आहेत ही बाब अत्यंत धोकादायक आहे. याचा आजच्या कुटुंबव्यवस्थेने विचार करणे गरजेचे आहे. आज समाजातील बालगुन्हेगारी ही केवळ गरिब घरापर्यत मर्यादित राहिली नसून ती मध्यमवर्गीयच्या फ्लॅट आणि श्रीमंताच्या बंगल्यापर्यत पोहोचली आहे. सांगली शहर व जिह्यात याचा दिवसें दिवस याचा पसारा वाढतो आहे.
घरातील आर्थिक परिस्थीती, कौंटुबिक परिस्थिती, तसेच चूकीच्या मित्राची संगत मुलांना बाल गुन्हेगारीकडे घेवून जात आहेत.
केवळ पैशासाठीच नाही तर सोशल मिडीयावर वेगवेगळे रिल्स तयार करून सवंग प्रसिध्दी मिळवण्याच्या धडपडीतून किशोरवयीेन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. सध्या हातात हत्यारे घेवून रिल्स बनविणे, सोशल मिडीयावर हत्यारासह स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड आला आहे. सांगली सारख्या नाट्यपंढरीत शाळा महाविद्यालयातील मुले दप्तरात चाकू घेवून भर दिवसा फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक या तरूणांना आहे कि नाही असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
खून, दरोडा या सारख्या गंभिर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपीचा हेतू हा केवळ सोशल मिडीवर भाईगिरीचा स्टेटस ठेवण्यासाठी आहे ही गंभिर बाब आहे. शाळकरी मुलांना सहज उपलब्ध होणारी हत्रारे चिंतेची बाब बनली असून पालकांनी याबाबत जागृत असणे आवश्यक आहे. अल्पवरीन मुलांची गुन्हेगारी प्रकरणे रोज वाढतच आहेत. गत आठवड्यात शहरातील एका शाळेत शाळकरी मुलांच्रा दोन गटात किरकोळ कारणांवर झाला. त्रानंतर चिडलेल्रा मुलांनी दप्तरातून चाकू काढत अक्षरशः राडा केला. काही दिवसांपुर्वी शहरातील स्टँड परिसरात अल्पवरीन मुलांनी रिल्स नंतर मोबाईल शॉपी चालकाचा कोरत्राने वार करत खून केला. तसेच यापुर्वी हरिपूर रोडवरील गुन्ह्यात ही अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे यावरून या प्रकाराची गांभिर्यता ठळकपणे दिसून येते.
आज अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरांमध्ये राजरोस नशेची औषधे तयार केली जात आहेत.
यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमावर आहे. गांजा, ड्रग्ज, नशेचे इंजेक्शन यारखे अंमली व नशेली पदार्थ तरूणांना आज सहजरित्या उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थाचे सेवन करणे ही आज तरूण वर्गात फॅशन बनत चालली आहे. विटा-सांगली रस्त्रालगत कार्वे औद्योगिक वसाहतीत कच्च्रा साहित्रांच्रा सहाराने मशिनद्वारे मेफॉड्रॉन (एमडी) तरार इंडस्ट्रीजमध्रे छापा टाकत 29 कोटी 73 लाख 55 हजार 200 रुपरांचे तरार एमडी ताब्रात घेतले. यापुर्वी देखील कूपवाड परिसरातून अंमली पदार्थाचे साठे जप्त करण्यात आले आहेत. मात्र याच्या मुळाशी जात अंमली पदाथार्ंची तस्करी रोखणे गरजेचे बनले आहे.
गुन्हेगारी जगताकडे वळणारी तरूणांची वेळीच रोखणे समाज्रासाठी आवश्रक आहे. गुन्हेगारीकडे वळणारी तरूणांईची पावले रोखणे निश्चीतच शक्र आहे मात्र त्रा दुष्टीने ठोस पावले उचलणे आवश्रक आहे. पोलिस, समाज, प्रशासन सामाजिक संस्था, शासन रा सर्व घटकांनी एकत्र रेत काम करणे आवश्रक आहे. पालकांनी देखीन आपली भुमिका ओळखून मुलांच्रा वर्तनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी. नशेखोरी रोखण्यासाठी कडक पाऊले उचलून त्राचीं पाळे-मुळे समुळ नष्ट करणे गरजेचे आहे.
भय इथले संपत नाही
सांगली जिल्ह्यात जानेवारी महिन्यात चार खून झाले आहेत. 2023 साली 66 खून झाले तर गतवर्षभरात 51 खूनाच्या घटना घडल्या आहेत. अनैतिक संबध, आर्थिक वाद, चारित्र्याचा संशय, जमिनीचा वाद या कारणांमुळे खून झाले आहेत. यात अनेक अल्पवयीनांचा सहभाग आहे ही गंभिर बाब आहे. तरूणांना अगदी सहजरित्या घातक हत्यारे मिळत आहे. यामुळे किरकोळ कारणातून ही गंभिर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत त्यामूळे सामान्य माणसांचे भय मात्र संपत नसल्याचे चित्र आहे.
पालकांचा मुलांशी संवाद आवश्यक
तरूण वरातील मुले नशेच्रा आहारी केली आहेत. किशोरवयीन मुलांकडे आज पालकांचे दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या हातातील मोबाईल तरूणाईचा पाय खोलात घेवून जात आहे. झटपट पैसा व प्रसिध्दी मिळण्यासाठी तर अनेकवेळा एखाद्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्यासाठी मुलांकडून गुन्हे केले जात आहेत ही गंभीर बाब आहे. पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढणे गरजेचे आहे. मुलाची संगत कोणाशी आहे. त्याचा वर्तनाचे निरक्षण करणे गरजेचे आहे. मुलांना मोबाईचा चांगला वापर कसा करायचा हे शिकवणे गरजेचे आहे. मूलांमध्ये सकारत्मक विचारसरणी तयार करणे गरजेची आहे.
– अर्चना मुळे,
समूपदेशक, सांगली
सर्व स्तरावर कृती आराखडा राबवणे आवश्यक
तरूणांमधील अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रणाण मोठे आहे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे मुलांच्या शारिरिक, मानसिक व कौंटूबिकतेवर अत्यंत गंभिर परिनाम होत आहे. यातुनच पूढे तरूणाकंडून खून, मारामारी, चोरी-दरोडा यासारखे गंभिर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. यातुन तरूणांना बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर काम केले जात आहे. समाजातील सेवाभावी संस्था, शााळा-महाविद्यालये यांनी यावर प्रतिबंधात्मक काम करणे आवश्यक आहे.
– डॉ. उदय जगदाळे, सांगली

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



