rajkiyalive

sangli crime news : जत शेगाव रस्त्यावर दुचाकी कारची जोरदार धडक, दोघे जागीच ठार

sangli crime news : जत शेगाव रस्त्यावर दुचाकी कारची जोरदार धडक, दोघे जागीच ठार : जत सांगोला राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी कार आणि दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघतात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना झाली. यत दोघेही सांगोला तालुक्यातील महीम गावचे असून,अजय लिंगाप्पा कारंडे वय 23 व प्रशांत दत्तात्रय लोखंडे वय 24 अशी त्यांची नावे आहेत.याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलीसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.पोलीसांनी कारचालक प्रशांत पवार रा. बारामती यास ताब्यात घेतले आहे.

sangli crime news : जत शेगाव रस्त्यावर दुचाकी कारची जोरदार धडक, दोघे जागीच ठार

अधिक माहीती अशी,जत सांगोला मार्गावरील रेवनाळ फाट्यावर असणार्‍या बस थांब्याजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांची समोरा समोर जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, दुचाकी चक्काचूर झाली.तर कारच्या ड्रायव्हर साइडचे मोठे नुकसान झाले.

या आपघातात मोटर सायकलवरील दोघेही जागीच ठार झाले.यातील मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे हे त्यांच्या वैयक्तीक कामानिमित्त मोटर सायकल क्रमांक एम. एच. 45 ए. यु. 3393 वरून जत शहरात आले होते. येथील काम आटोपून ते आपल्या महीम या गावाकडे निघाले होते.त्यांची मोटर सायकल रेवनाळ फाट्यावर आली असता,समोरून बारामती कडून येणारी कार क्रमांक एम. एच. 42 बी. एन. 9993 यांच्यात समोरा समोरच भीषण धडक झाली.यात कारमधील एअर बॅग उघडल्याने आतील चार जणांना कांहीही झाले नाही.कार कांही अंतर रस्त्याच्या बाजूला जावून थांबली. कारमधील प्रवाशी हे लग्न समारंभानिमित्त कर्नाटककडे निघाले होते.

दुचाकी दीडशे फुट फरफटत गेली

या अपघातात दोन्ही वाहने वेगात असल्याने समोरच्या कारगाडीने दुचाकीला धडक देताच, दुचाकी तब्बल दीडशे फुट सिमेंट रस्त्यावरून फरफटत गेली. यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती पोलीसांना मिळताच, पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तर कार चालकासह गाडी जत पोलीसांनी ताब्यात घेतली आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज