जनप्रवास वारणावती ः
SANGLI CRIME NEWS : आरळा – बेरडेवाडी घाट मार्गावर दोनशे फूट खोल दरीत स्कॉर्पिओ गाडी कोसळून भीषण अपघात : शिराळ्याहून मणदूर धनगरवाड्याकडे जाणारी स्कॉर्पिओ गाडी आरळा बेरडेवाडी जाणार्या घाट मार्गावर अंदाजे दोनशे फूट खोल दरीत कोसळुन भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
SANGLI CRIME NEWS : आरळा – बेरडेवाडी घाट मार्गावर दोनशे फूट खोल दरीत स्कॉर्पिओ गाडी कोसळून भीषण अपघात
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की,मणदुर धनगरवाडा येथील शेळके कुटुंब स्कॉर्पीओ गाडी क्र.एम.एच.04 डी.एन.4622 मधुन शिराळ्याहुन आरळा बेरडेवाडी मार्गे मणदुर धनगरवाडयाकडे आपल्या गावी निघाले होते.मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरळा बेरडेवाडी जाणार्या घाट मार्गावर मुसळधार पावसामुळे चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी अंदाजे दोनशे फुट खोल दरीत पलटी होऊन भिषण अपघात झाला.
यामध्ये संजय रामचंद्र शेळके वय वर्ष 27, त्यांची पत्नी अर्चना संजय शेळके वय वर्ष 23, मुलगा पिंटू संजय शेळके वय वर्ष 2,रमेश तुकाराम शेळके वय वर्ष 14, भारती भागोजी डोईफोडे वय वर्ष 15 हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण मणदुर धनगरवाडा ता.शिराळा येथील आहेत.
गंभीर जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दरीतुन बाहेर काढण्यात आले.सर्व जखमींना 108 रुग्नवाहीकेतुन पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हास्पीटलला हलवण्यात आले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.