sangli crime news : हरिपुरात गाडी आडवी मारली म्हणून केला खून : मिरज तालुक्यातील हरिपूर येथील मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास तरूणावर धारधार शस्त्राने तब्बल 24 वार करत निर्घृण खून करण्यात आला. सुरज अलिसाब सिदनाथ (वय 32 रा. पवार प्लॉट, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घडलेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
sangli crime news : हरिपुरात गाडी आडवी मारली म्हणून केला खून
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार बारा तासात सात संशयितांना ताब्यात घेतले. गाडी अडवी मारल्याच्या शुल्लक कारणातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. यातील काही संशयित अल्पवयीन असल्याने रात्री उशीरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत सुरज सिदनाथ हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील पवार प्लॉट परिसरात राहतो. सुरज हा सकाळी अंकली येथील वीटभट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणार्या हॉटेल संगम येथे वेटरचे काम करायचा. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरज हा नेहमी प्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता. मध्यरात्री पाऊणे बारा ते सव्वा बाराच्या सुमारास सुरज हा त्याची दुचाकी (एमएच 10 एएन 2232) वरून घराकडे येत होता.
त्यावेळी काही संशयित त्याच रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते. त्यावेळी सूरज आणि संशयित यांच्या गाडी अडवी मारल्याच्या शुल्लक कारणातून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी सुरज यास हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ गाठले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात स्वतःला बचावण्यासाठी सुरज हा हरिपूरच्या दिशेने पळू लागला.
काही अंतरावर असणार्या एका घराच्या गेटसमोर तो कोसळला. त्याठिकाणीही हल्लेखोरांनी वार केले. वार वर्मी असल्याने अतिरक्तस्त्रावाने सुरजचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सुरज याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावले. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणी पाठवण्यात आला. सूरज याच्यावर 24 वार झाले आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुलीही दिल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.