सांगली :
sangli crime news : उमदीतील आंतरराज्य जुगार अड्ड्यावर उध्वस्त करत मोठी कारवाई : 41 जणांना ताब्यात घेत 19 लाखांच्या रोकडसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. : उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलगुंजनाळ फाट्यावर सुरु असणार्या सर्वात मोठ्या आंतरराज्य बजंत्रीच्या जुगार अड्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाने छापा टाकून जुगार अड्डा उध्वस्त केला. जिल्हा पोलीस दलातील सर्वात मोठी कारवाई आज (सोमवारी) करण्यात आली. याठिकाणी जुगार खेळणार्या सोलापूर, सांगली जिल्ह्यातील जुगारींसह कर्नाटकातील तब्बल 41 जणांना ताब्यात घेण्यात आले तर चौघे पळून गेले. या अड्ड्यावरून पोलिसांनी तब्बल 19 लाख 36 हजार 750 रुपयांची रोकड, 10 लाख 38 हजार 800 रुपयांचे 43 मोबाईल, 18 लाखांच्या चार कार, आणि सव्वा लाखांच्या दोन दुचाकी असा एकूण 48 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या धाडसी कारवाईने अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत.
sangli crime news : उमदीतील आंतरराज्य जुगार अड्ड्यावर उध्वस्त करत मोठी कारवाई : 41 जणांना ताब्यात घेत 19 लाखांच्या रोकडसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त.
चन्नाप्पा मल्लिकार्जुन मोकाशे, मेहबूब चांदसाब बोरगी, आनंद निलेश बिरादार, आश्रम दादापीर जमादार, जावेद मेहबूब मुल्ला, इलाई महमूद शेख, सलीम बाबुलाल मुजावर, संजू शांतगोंडा बिराजदार, शकील अल्लाबीक्ष हुकली, सुभाष कल्लाप्पा गुडीमनी, महाराज मल्हारी उपाडे, रवी बसवंत शेगोंशे, सुनील महादेव राठोड, मोहम्मद हुसेन फारुकी, मोहम्मद फैयाज शहाबुद्दीन शेख, अल्ताफ जब्बार गुंडेवाडी, बसवराज शंकराप्पा केमशेट्टी, फैयाज अहमद इनामदार, अप्पू बिराप्पा इंचगिरी, इसाक मकबूल हुबली, अमजद खान पठाण, मुजाहिद इब्राहिम साहब जमादार (सर्व रा. विजयपूर, कर्नाटक), निजाम अब्दूल समदखान (रा. सोलापूर), कादिर राजासाब बागवान (रा. ताळीपुर), रवी शांताप्प शिंदे (रा. चडचण), भीमाप्पा बसप्पा सानातंगी (रा. आगसबाळ), विनोद रामलाल अग्रवाल (रा. बागेवाडी), इमामसाब अल्लाबक्ष छपरबंद (रा.आगसबाळ), जगदीश भिमराया कुंभार (रा. इंडी), आनंद शिवानंद बेळुंडगी (रा.कन्नूर), योगेश मल्लिकार्जुन वागदरे (रा. उमदी), श्रीशैल ईरय्या घेरडी (रा. सालोटा), शिवशंकर वीरांना गब्बूर (रा. मनगुळे), अबू तालीम बागवान (रा. दवाहिप्परगी), सतीश मुरगेप्पा बेळुंडगी (रा. कन्नूर) परसाप्पा तिमांना मेरी (रा. जयवाडी), सोमनाथ सिद्रामप्पा नाटेकर (रा. बागेवाडी), प्रकाश शरणाप्पा पुजारी (रा. बुद्याळ), मलिक साहब मोदीनसाब घुगरे (रा. कर्नाटक) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. तर घटनास्थळावरून मेहबूब गोल्डन, सादिक इनामदार, मुन्ना बागवान (तिघे रा. विजापूर) आणि संदीप चौगुले (रा. जयसिंगपूर) हे पळून गेले.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कर्नाटक बॉर्डरवर असलेला सीमावर्ती भाग नेहमीच अवैध धंद्यांनी चर्चेत राहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे उध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक तयार केले होते. संदीप शिंदे यांना गुलगुंजनाळ फाट्याजवळ हॉटेल हायवे इन एक्झीक्युटीव्हच्या मागील बाजूस असलेल्या बंद खोलीत संतोष बजंत्री यांच्यासह काहीजण पैसे लावून बेकायदेशीरपणे तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
यानंतर तातडीने एक पथक तयार करून याठिकाणी छापा टाकला असता 40 ते 45 जण पाच ठिकाणी गोलाकार बसून मध्यभागी पैसे व पत्ते ठेवून तीन पानी जुगार खेळत होते. पत्त्याची पाने, पैसे, मोबाईल जागीच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना जागीच बसण्यास सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी 19 लाखांच्या रोकडसह 48 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून उमदी पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, उमदी परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या आंतरराज्य जुगार अड्डा कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता? याची रंजक चर्चा सुरु होती. तसेच उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना याची माहिती नसावी का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक अफरोज पठाण, कर्मचारी, दीपक पवार, समाधान जाधव, गणेश तांबे, वैभव दळे, साहिल शिंदे, राजवर्धन तोडकर आणि देविदास जाधव यांच्या पथकाने केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



