rajkiyalive

sangli crime news : कार्वे खूनप्रकरणी नऊ आरोपींना अटक

sangli crime news : कार्वे खूनप्रकरणी नऊ आरोपींना अटक : कार्वे (ता.खानापूर) येथील राहुल गणपती जाधव (रा.कार्वे, ता.खानापूर) याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे (दोघे ही रा. मंगरूळ, ता. खानापूर), नैन रंगलाल धामी, अमृतराज शहाजी माळी, रोहन रघुनाथ जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, संतोष मारुती हजारे, दीपक पांडुरंग जाधव (सर्व रा.कार्वे, ता.खानापूर) प्रतीक श्रीकांत मोरे (रा.बोरगाव, ता.वाळवा) या नऊ जणांना अटक करण्यात विटा पोलिसांना यश आले असल्याची माहिती

sangli crime news : कार्वे खूनप्रकरणी नऊ आरोपींना अटक

विटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी नितीन पांडुरंग जाधव याचा विटा पोलिस शोध घेत आहेत त्याला ही लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी व्यक्त केला.

पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे म्हणाले की, दि.15 जानेवारी 2025 रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास कार्वे (ता.खानापूर) येथील राहुल गणपती जाधव (रा.कार्वे, ता.खानापूर) याचा दहा जणांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवुन शस्त्र बाळगुन वाहनाच्या काचा फोडुन तलवारीने, काठीने डोक्यात वार करुन खुन केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रीतु खोखर, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना या गुन्हयाचा तपास करुन आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत विटा पोलिसांना आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन या सर्व आरोपीना अटक करण्यासाठी कसोशीने तपास चालु केला. या गुन्हयाचा तपास चालु असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींचा शोध घेवुन तात्काळ आरोपी माणिक परीट,
गजानन शिंदे, नैन धामी या तिघांना ताब्यात घेवुन अटक केली होती. त्यांच्याकडुन इतर आरोपींची नावे निष्पन्न केली. तसेच त्यांच्या पोलीस कस्टडी मुदतीत आरोपी अमृतराज माळी, रोहन जाधव, प्रफुल्ल कांबळे यांचा शोध घेवुन सदर गुन्हयाच तपासकामी अटक केली होती.

या सर्व आरोपीची गुन्हयाच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यांच्याकडुन आरोपी संतोष हजारे, प्रतीक मोरे, दीपक जाधव या तिघांची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी नितीन पांडुरंग जाधव याचा विटा पोलिस शोध घेत आहेत त्याला ही लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी व्यक्त केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन शेंडकर, पोलिस उपनिरीक्षक विशाल येळेकर, सचिन माळी, विश्वजीत काळे, अभिजीत कणसे, सहायक पोलिस फौजदार मणगिणी मल्लाळकर, विटा पोलीस ठाण्याचे

पोलिस कॉन्स्टेबल किरण खाडे, नंदकुमार पवार, कृष्णा गडदे, उत्तम माळी, मधुकर माने, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते, सचिन हाक्के, गणपत गावडे, अमोल कदम, संग्राम जाधव, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, वैभव कोळी, अक्षय जगदाळे, किरण पाटील, अमित मोरे, गोरक्ष धुमाळ, आदेश केदार तसेच सायबर पोलीस ठाणे, सांगलीचे पोलिस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, पोलिस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे, विजय पाटणकर यांच्या पथकाने नऊ आरोपींना गजाआड करण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज