rajkiyalive

sangli crime news : कुख्यात गुंड म्हमद्या नदाफचा आर्थिक वादातून गोळीबार : दोन तासात आवळल्या चौघांच्या मुसक्या

सांगलीत टोळी अंर्तगत वादातून कृत्य; गोळीबारात एकजण गंभीर जखमी.

sangli crime news : कुख्यात गुंड म्हमद्या नदाफचा आर्थिक वादातून गोळीबार : दोन तासात आवळल्या चौघांच्या मुसक्या :  तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड ममद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ याने टोळीतील साथीदारावर आर्थिक वादातूनच गोळीबार केल्याचे आज समोर आले. गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात काल रात्री अकराच्या सुमारास हा गोळीबार केला. यात त्याच्याच टोळीतील सलीम मकबुल मुजावर (42, रा. गणेशनगर) हा गंभीर जखमी असून तो उपचार घेत आहे. टोळीतील अंतर्गत वादाचा ऐन निवडणूकीत भडका उडाल्याने शहरात खळबळ माजली.

sangli crime news : कुख्यात गुंड म्हमद्या नदाफचा आर्थिक वादातून गोळीबार : दोन तासात आवळल्या चौघांच्या मुसक्या

दरम्यान, घटनेनंतर पसार झालेला गुंड म्हमद्या याला दानोळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे थरारक पाठलाग करत मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यासह इम्रान अस्लम दानवडे (वय 30, रामनगर), विजय उर्फ पप्पु बजरंग फाकडे (40, रा. हरिपूर) आणि फारूक मुस्ताक नदाफ (सर्वधर्म चौक, गणेशनगर) या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. एलसीबी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित पप्पू फाकडे आणि इम्रन दानवडे हे दोघे म्हमद्याच्या टोळीतील साथीदार आहेत. दोघांमधील आर्थिक कारणावरुन तसेच जखमी सलीम मुजावर याचे अजय माने समवेत असलेल्या संबंधाच्या कारणातून संशयित तिघांनी सलीम यास जीवे मारण्याचा कट रचला. काल रात्री अकराच्या सुमारास म्हमद्या नदाफ, इम्रान दानवडे आणि पप्पू फाकडे असे तिघे शंभर फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले. सलीम मुजावर यास संशयित फारुक नदाफ याने फोन करुन घराबाहेर बोलावले.

तो बाहेर येताच आधीपासून तयारीत असणार्‍या म्हमद्याने कंबरेला लावलेले पिस्तूल काढून सलीमच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केला. यात सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर चौघांनीही घटनास्थळावरुन पलायन केले.

गोळीबार झाल्याचे समजताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोकर, सहायक अधीक्षक विमला एम., निरिक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरिक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदिप शिंदे, पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमी सलीम यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पोलिस पथके जिल्ह्यासह अन्यत्र पाठविण्यात आली. गुंड म्हमद्या नदाफ हा शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील दानोळी येथे जमीर नदाफ याच्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोन तासात म्हमद्याच्या मुसक्या आवळ्या. दरम्यान, अन्य तिघे सांगलीत असल्याची माहिती पोलिस पथकास मिळाल्यामुळे त्यांनी सांगलीत शोधमोहिम राबवून त्यांना ताब्यात घेतले. गोळीबार प्रकरणात अन्य काहीजणांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांनी दिली.

घरात घुसून कारवाई. म्हमद्यावर 26 गुन्हे दाखल.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक म्हमद्याच्या मागावर होते. तो दानोळीत येथे असल्याची माहिती मिळताच. तातडीने पथक रवाना झाले. कुख्यात गुंड असल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बळगली. त्याच्या घरात घुसून पोलिसांनी एंट्री केली. पोलिस पाहून म्हमद्या पळाला.

पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. महम्मद नदाफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यासह कर्नाटक येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, घरफोडी, आर्म क्ट असे 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्काच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आहे. त्याला कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात प्रवेशबंदी घालण्यात आली होती.

तसेच इम्रान दानवडे आणि विजय उर्फ पप्पू फाकडे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. इम्रान याच्यावर मॅच बेटिंग, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. पप्पू फाकडे पाच गुन्हे दाखल आहेत. सावकारीसह आर्म क्ट, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज