rajkiyalive

sangli crime news : सांगलीत भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला चिरडले : एकजण गंभीर जखमी.

सांगली :

 sangli crime news : सांगलीत भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला चिरडले : एकजण गंभीर जखमी. : शहरातील कोल्हापूर रोडवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव कार ने धडक देऊन चिरडले. या अपघातात गौसपाक मेहबूब पखाली हे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात हा रविवार दि. 01 सप्टेंबर रोजी पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी मोईन गौसपाक पखाली (रा. काळीवाट हरिपूर) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

sangli crime news : सांगलीत भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला चिरडले : एकजण गंभीर जखमी.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी गौसपाक पखाली हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील काळीवाट परिसरातील वकील कॉलनी मध्ये राहतात. दररोज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटेच्या सुमारास पखाली हे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले. साडे सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरून चालत निघाले असता उदय हॉटेल समोर भरधाव वेगात एक स्विफ्ट कार चालक घेऊन आला.

चालत निघालेल्या पखाली यांना या कार ने जोराची धडक देत चिरडले. या अपघातात पखाली खांद्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच पोटामध्ये रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला. रस्त्यावरील नागरिकांनी पखाली यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी मोईन पखाली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज