मृत्यूपत्राची नोंदणी करण्यासाठी घेतली 24 हजारांची लाच.
सांगली :
sangli crime news : पेठचे मंडल अधिकारी, तलाठ्यासह तिघे लाचलुचपच्या जाळ्यात : : मृत व्यक्तीच्या मृत्यू पत्राची नोंदणी करण्यासाठी 24 हजारांची लाच घेणार्या वाळवा तालुक्यातील महादेववाडी येथील तलाठी, पेठ गावचे मंडल अधिकारी आणि कोतवाल या तिघांना रंगेहात जेरबंद केले. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने इस्लामपूर येथील हॉटेलमध्ये सदरची कारवाई केली.
sangli crime news : पेठचे मंडल अधिकारी, तलाठ्यासह तिघे लाचलुचपच्या जाळ्यात :
तलाठी श्रीमती सोनाली कृष्णजी पाटील (वय 35), मंडल अधिकारी मल्हारी शंकर कारंडे (वय 49) आणि कोतवाल हणमंत यशवंत गोसावी अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील एक हॉटेलमध्ये हा सापळा रचण्यात आला. लाचलुचपतच्या या ट्रीपल कारवाईने महसूल विभागाचे धाबे दणाणले आहे
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजोबांनी वडील व्यसनी असल्याने त्यांची वाळवा तालुक्यातील मौजे महादेववाडी येथील वडिलोपार्जित जमीन आईच्या नावावर होण्यासाठी 2004 साली मृत्युपत्र करून ठेवले होते. 2009 साली तक्रारदारांचे आजोबा मयत झाले होते. यातील तक्रारदार यांनी सुमारे 9 महिन्यापूर्वी तलाठी श्रीमती सोनाली पाटील यांच्याकडे मृत्युपत्राची नोंद होण्यासाठी आईचे नावाचा अर्ज दिला होता.
सदर मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा सदरी नाव लावून देण्यासाठी तलाठी आणि कोतवाल यांनी 25 हजारांची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार केली. लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी केली असता दोघांनी सुरवातीला 25 हजारांची मागणी करून तडजोडी अंती 24 हजार मागितले.
यानंतर पथकाने तातडीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर हॉटेल आण्णा बुट्टे येथे सापळा लावला असता तक्रारदारांकडून 24 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते. सदरची कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील यांनी केली
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.