सांगली : sangli crime news : समडोळीत बेकायदेशीर दारूचा साठा करणार्या धाब्यावर पोलिसांचा छापा ” सांगलीवाडी ते समडोळी जाणार्या मार्गावर असलेल्या आप्पाचा ढाबा येथील पत्र्याच्या शेड मध्ये ठेवलेला देशी, विदेशी दारूच्या साठ्यावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून विदेशी आणि देशी मद्याचा मोठा प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला. शहर विभागाच्या उपअधीक्षका आयपीएस विमला एम यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली. दिलीप बापू पवार (वय 48 रा. कसबेडिग्रज) असे कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
sangli crime news : समडोळीत बेकायदेशीर दारूचा साठा करणार्या धाब्यावर पोलिसांचा छापा
सांगलीसह ग्रामीण परिसरात सुरु असणार्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम यांनी दिले आहेत. त्यांनी यासाठी ऑपरेशन मुक्ती या नावाने पथक स्थापन केले आहे. या पथकातील कर्मचारी प्रदीप आरसले यांना माहिती मिळाली कि, संशयित दिलीप पवार यांनी समडोळी मार्गावरील आप्पाचा ढाबा परिसरात असणार्या पत्र्याच्या शेड मध्ये देशी, विदेशी मद्याचा साठा केला आहे.
त्यानुसार शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मिळाल्या. याठिकाणाहून मॅकडोल नंबर 1 च्या 180 मिलीच्या आठ बाटल्या, रॉयल स्टॅग 180 मिलीच्या 11 बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू 180 मिलीच्या दहा बाटल्या, ट्युबर्ग बिअर, टँगो पंच देशी दारू, थ्री एक्स देशी दारू, कृष्णा देशी संत्रा आणि रोकड असा एकूण 12 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पवार यांच्यावर कारवाई केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.