sangli crime news : दुधगाव मधील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई : सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त.” मिरज तालुक्यातील दुधगाव येथे असणार्या चांदोली वसाहत येथील बंद पडलेल्या अंगणवाडी येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणार्या सहा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
sangli crime news : दुधगाव मधील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई : सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त.
मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. महेश मारुती सावर्डे (वय 40), मिलिंद दादा साजणे (वय 56), संजय कुमार लांडे (वय 47), बाळू बंडू गवळी (वय 38), राम निवृत्ती गवळी (वय 36) आणि सुशांत महावीर कुदळे (वय 30 सर्व रा. दुधगाव) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेखर पवार यांना माहिती मिळाली कि, दुधगाव येथील चांदोली वसाहत येथे असणार्या बंद पडलेल्या अंगणवाडी इमारतीच्या पाठीमागील बाजूस तीन पानी जुगार अड्डा सुरु आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला असता सहा जण स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर तीनपानी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी या सहा जणांसह अडीच हजार रुपये रोख, दोन मोबाईल, दोन मोटारसायकली असा एकूण 1 लाख 22 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.