rajkiyalive

sangli crime news : गणपती पेठेतील दुकान फोडणारे परप्रांतीय सराईत चोरटे जेरबंद : दुचाकी चोरीचा गुन्हा उघड 

sangli crime news : गणपती पेठेतील दुकान फोडणारे परप्रांतीय सराईत चोरटे जेरबंद : दुचाकी चोरीचा गुन्हा उघड  :  गणपती पेठेतील मिठाचे दुकान फोडून रोकड लंपास करणार्‍या तसेच विश्रामबाग मधून मोपेड दु0चाकी चोरांच्या आंतरराज्य सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून दुकानातून चोरलेले पाच लाख, 66 हजारांची दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण 5 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तानंग फाटा परिसरात सदरची कारवाई केली. सुहेल ए जे लियाकत अली (वय 25), एस डी इरफान अली एस दादापीर (वय 21), बी के मोहम्मद तय्यब रेहमानवली (वय 21, रा. होस्पेट, जि. बेल्लारी राज्य कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

sangli crime news : गणपती पेठेतील दुकान फोडणारे परप्रांतीय सराईत चोरटे जेरबंद : दुचाकी चोरीचा गुन्हा उघड 

याबाबत अधिक माहिती अशी कि, गणपती पेठेत रफीक कादर कच्छी (रा. गणपती पेठ, मूळ रा. उपलेटा, गुजरात) यांचे मिठाचे दुकान आहे. दि. 28 डिसेंबर रोजी रात्री आठनंतर चोरट्याने त्यांच्या दुकानाने कुलूप तोडून कपाटातून रोकड लंपास केली होती. याबाबत कच्छी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या चोरीचा तपास करत असताना गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तानंग फाटा परिसरात तिघे संशयित काळ्या रंगाच्या मोपेडवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. तिघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली. तेव्हा बी. के. मोहम्मद याच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये रोकड व लोखंडी कटावणी मिळाली. रोख रक्कम व मोपेडबाबत चौकशी केल्यानंतर तिघांनी गणपती पेठेतील बंद दुकान फोडल्याचे तसेच विजयनगर चौकातून मोपेड लंपास केल्याची कबली दिली. तिघांना रोकड, मोपेडसह सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, सुहेल, एस डी इरफानअली, बी के मोहम्मद हे तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

त्यांच्यावर दुचाकी, घरफोडीचे गुन्हे कर्नाटकात दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात मिळाली. सदरची कारवाई पोलीस सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी महादेव नागणे, सागर लवटे, अनिल कोळेकर, दर्‍याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, नागेश खरात, उदय माळी, सोमनाथ पतंगे, विक्रम खोत यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज