sangli crime news : कसबेडिग्रज येथील हॉटेल मधील साहित्यावर चोरट्यांनी मारला डल्ला : 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल केला लंपास. : सांगली : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज येथे असलेले बंद हॉटेल फोडून चोरटयांनी त्यातील फ्रिज, मिक्सर, कटर, ग्रॅण्डर मशीन, ताटे आणि वाट्यांसह 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घरफोडीची घटना हि शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी हॉटेल हिंदवी येथे पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी बाबासो सलाउद्दीन शिलेदार (वय 50 रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : कसबेडिग्रज येथील हॉटेल मधील साहित्यावर चोरट्यांनी मारला डल्ला : 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल केला लंपास.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बाबासो शिलेदार यांचे कसबे डिग्रज येथे शिलेदार नावाने हॉटेल आहे. शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास कोणी नसल्याचे पाहून बंद हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
हॉटेल मध्ये ठेवलेले एक मोठा एक लहान डी फ्रिज त्यातील साहित्यासह, सात सिलिंग फॅन आणि एक टेबल फॅन, एक हजार आणि दीड हजार व्हॅटचे दोन मिक्सर, स्टील बॉडीचे मसाला करण्याचे ग्रॅण्डर मशीन, कांदा कटर मशीन, स्टीलचे हॉट केस दोन सेट, स्टीलची 100 ताटे, स्टीलच्या 200 वाट्या, स्टील ग्लास 70, स्टीलचे दहा पाणी जग, आठ मोठी जर्मनी पातेले, दहा लहान पातेली, 100 स्टीलचे चमचे, स्टीलचे मोठे दहा चमचे, पातेली झाकण दहा, चावी, बेसिन, शॉवर, स्टील गॅस शेगडी, लोखंडी अँगल, 1 हजार 500 रुपये कॅश, फ्राय पॅन, रसा जग, चार कढई, मोठे जर्मनी डबे सहा, लहान स्टील डबे आठ आणि फ्रिज असा एकूण 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले.
शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर शिलेदार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



