sangli crime news : तुंगजवळील बिअर बार मधील दारूवर चोरट्यांचा डल्ला : दारूच्या तब्बल 190 बाटल्या केल्या लंपास. : सांगली : शहरातील पेठ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल ड्रिमलँड नावाच्या बिअर बारवर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दारूच्या भरलेल्या 190 बाटल्यांसह 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घरफोडीची घटना हि शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुनील श्रीमंत जाधव (वय 42 रा. तुंग) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : तुंगजवळील बिअर बार मधील दारूवर चोरट्यांचा डल्ला : दारूच्या तब्बल 190 बाटल्या केल्या लंपास.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनील जाधव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये राहतात. त्यांचे ड्रिमलँड नावाने बिअर बार हॉटेल सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील मिणचे मळा परिसरात आहे. गुरुवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे जाधव हे हॉटेल बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी हॉटेलजवळ कोणी नसल्याचे पाहून हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

हॉटेल मध्ये ठेवलेले 9 हजार 120 रुपये किमतीचे रॉयल स्टॅग कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स, 13 हजार 440 रुपयांचे ब्लॅक डीएसपी कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स, 7 हजार 680 रुपये किमतीच्या 48 बाटल्यांचा आयबी कंपनीचा एक बॉक्स, मॅकडोल कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स आणि दोन हजार रुपये रोख असा एकूण 39 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले.
दुसर्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. यानंतर सुनील जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



