rajkiyalive

sangli crime news : सांडगेवाडीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा क्लीनर जागीच ठार

sangli crime news : सांडगेवाडीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा क्लीनर जागीच ठार : सांडगेवाडी ता. पलूस येथील मारुती मंदिराजवळ कराड – तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते (वय 22) राहणार देशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाणे येथे झाली आहे.

sangli crime news : सांडगेवाडीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा क्लीनर जागीच ठार

सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच 10 डीजी 1478 पंक्चर झाल्याने रस्त्यालगत उभा केलेला होता. या ट्रॅक्टरमध्ये मयत अवधूत सदामते हा झोपलेला होता. यावेळी ट्रक कुंडलवरून सांगलीकडे निघालेला होता. तर ट्रॅक्टर हा बगॅस भरून पलूस वरून देशिंग गावच्या हद्दीत असणार्‍या जॉली बोर्ड फॅक्टरीकडे येत होता.

यावेळी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 46 ए एफ 1832 या ट्रकवरील अज्ञात चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली. अपघात इतका गंभीर होता की, ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला.या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत सदामते ठार झाला तर अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.

याबाबत ट्रकचालका विरुद्ध त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयीगयीने स्वतःच्या जीविकास धोका निर्माण होईल अशारीतीने चालवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉलीज पाठीमागून जोराची धडक देऊन, अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत सदामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थांबता कोणतीही मदत न करता कुठेतरी निघून गेला आहे,

म्हणून पलुस पोलीस ठाण्यात ट्रकचा अज्ञात चालक याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद महादेव शिवाजी चव्हाण (वय 43) व्यवसाय ड्रायव्हर, राहणार लक्ष्मीनगर, पलूस यांनी दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज