sangli crime news : ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरखाली युवक चिरडून गंभीर जखमी : अंकली पुलाजवळ घटना. : सांगली : कोल्हापूर मार्गावर अंकली पुलाच्या अलीकडेच ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरखाली एक युवक चिरडला आहे. ऊसाच्या ट्रॅक्टरचे चाक त्याच्या पायावरून गेले आहे. त्यात तो गंभीर झाला असून तातडीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री प्रकृती गंभीर असून ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती. दरम्यान, सांगली-कोल्हापूर महामार्गावर दोन्ही वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगाच्या रांगाच लागल्या होते. अखेर दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.
sangli crime news : ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरखाली युवक चिरडून गंभीर जखमी : अंकली पुलाजवळ घटना.
घटनास्थळावरून मिळाली माहिती की, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर चोवीस तास वाहतूक असते. अंकली पुलाजवळ अतिक्रमणांचा मोठा विळखा असल्याने अपघाताला निमंत्रण दिले जाते. त्यात आता ऊस वाहतूकीचा मोठा ताणही याच रस्त्यावर असतो. आज सकाळी अकराच्या सुमारास एक युवक त्याठिकाणी आला होता. ट्रॅक्टर रस्त्याने जात असताना मला घेऊन चला, अशी विनवणी त्या युवकाने चालकाला करीत होता. ट्रॅक्टर न थांबल्याने धुंद असलेला हा युवक तसाच ट्रॅक्टरमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तो ट्रॅक्टरखाली सापडला. या अपघातात त्याचा पायला गंभीर इजा झाली असून घटनेनंतर मोठी गर्दी परिसरात जमली.
ग्रामीण पोलिसांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत जखमी युवकास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मिरजेतील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. दरम्यान, अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात होती. जखमी युवकास मदत करण्याऐवजी अपघाताची छायाचित्रे टिपण्यात अनेकजण व्यस्त दिसून आले. यावेळी जखमी युवकास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंत महत्वाचे होते. अखेर 108 च्या रुग्णवाहिकेने क्षणात हजेरी लवली. तत्काळ रुग्णास उपचारासाठी दाखल केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.