sangli crime : सांगलीत धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं: राज्यात सासरच्या छळाने विवाहित महिलांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाच सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करण्यासाठी होणारया त्रासाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे.
sangli crime : सांगलीत धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं
सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणार्या ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27) च.डल झालेल्या उच्चशिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणार्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला व जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. ऋतुजा ही आत्महत्येच्यावेळी ही सात महिन्याची गरोदर होती. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी नवरा,सासू, सासर्याला अटक केली असून त्याना पोलिस कोठडी मिळालीय.
सुकुमार राजगे व ऋतुजा यांचा 2021 मध्ये विवाह झाला होता. या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबांनी आम्ही हिंदू धनगर आहोत, असे सांगितले होते. पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे, हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले. तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होती.
पण नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर, आमच्याबरोबर चर्चला चल, असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली.
बर्याचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च, सांगली व मिरज खतिबनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणार्या चर्चमध्ये घेऊन गेले व इथे धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीही केली. चर्चमधील पास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते, पूजा करते त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत, असं सांगत होते.
sangli-crime-pressure-to-change-religion-in-sangli-7-month-pregnant-daughter-in-law-ends-life
ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतरणाबद्दल सांगितले होते, त्यांनी अनेकदा येऊन सासू व सासरे व पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे करावे असा तगादा लावला होता. याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या सात महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करताना तरुणी सात महिन्यांची गर्भवती
एका उच्चशिक्षित सुशिक्षित घरातील ऋतुजाने सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचे पाऊल उचललं यावरूनच लक्षात येते की ऋतुजा हिला धर्मांतरण करण्यासाठी किती मोठा त्रास देण्यात आला होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता. ऋतुजाच्या आई वडिलांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन, सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले आहे, जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणाच्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये. सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झाला आहे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.