rajkiyalive

SANGLI CRIMRE : विट्यात नशेचे इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SANGLI CRIMRE : विट्यात नशेचे इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जनप्रवास/विटा

SANGLI CRIMRE : विट्यात नशेचे इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश :  शरीरसौष्ठववाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा विटा पोलीसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दिलीप बाबूराव ठोंबरे (वय ४८, रा.नेहरूनगर, विटा), सुशांत हिंदूराव जाधव (वय २७, रा.पुणदी रोड, तासगाव, मूळगाव हातनोली) व अमरदिप रामचंद्र भंडारे (वय ४०, रा. कार्वे, ता.खानापूर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ८ हजार रूपये किंमतीच्या १६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

SANGLI CRIMRE : विट्यात नशेचे इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तिघांना अटक ; विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीरसौष्ठव वाढत असल्याचे सांगून तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाऊंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या १६ सीलबंद बाटल्या सापडल्या.
त्यावेळी पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव व अमरदिप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे पोलीसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून तर अमरदिप भंडारे याला कार्वे येथून अटक केली. विटा पोलीसांनी तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या इंजेक्शनच्या बाटल्या या कोठुन खरेदी केल्या आहेत त्याच्या मुळापर्यत जावुन सखोल तपास करणार असल्याचे
पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
 ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन, पोलिस कॉन्स्टेबल उत्तम माळी, किरण खाडे, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते, प्रमोद साखरपे, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, वैभव कोळी, किरण पाटील, अमित मोरे व अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक राहुल करंडे यांच्या पथकाने कारवाई केली. याबाबत विटा पोलिस ठाण्यात
पोलिस हेडकॉन्स्टेबल दिग्विजय कराळे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर करीत आहेत.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज