rajkiyalive

SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ व ग्रा. प. सदस्य आक्रमक.

जनप्रवास : देवराष्ट्रे
SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे : देवराष्ट्रे ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून शुल्लक गोष्टींवरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. साध्या दाखल्याकरीता ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत यामुळे गावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुक्रवारी आक्रमक होत ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याबाबत ग्रा. प. सदस्य व ग्रामस्थ यांनी गुरुवार (दि. 16) रोजी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.

SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की, देवराष्ट्रे (ता. कडेगांव) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होतो आहे. साध्या दाखल्याकरीता सुध्दा ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामपंचायतकडे लाखों रुपयांचा निधी आहे परंतु यांच्या अनागोंदी कारभारामुळे विकास कामे खोळंबली आहेत तर सरपंच मीटींग व्यतिरिक्त ग्रामपंचायत येत नाहीत यामुळे ग्रामस्थांना दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागतात

यामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. हा अनागोंदी कारभार थांबावा यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्य वैभव होनमाने, अनिल मोरे व ग्रामस्थ आशिष मोरे, मोहन मोरे, अभिजित जाधव, सुर्याजी पाटील, प्रल्हाद मिसाळ यांसह ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले होते.

यानंतर दुपारी कडेगांव पंचायत समितीचे अधिकारी याठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणने ऐकल्यानंतर यांवर आचारसंहिता संपल्यानंतर तोडगा काढण्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यानंतर ग्रामपंचायतचे टाळे उघडण्यात आले.

देवराष्ट्रे ग्रामपंचायतला टाळे ठोकताना ग्रा.प. सदस्य वैभव होनमाने, अनिल मोरे, आशिष मोरे, अभिजित जाधव, मोहन मोरे, सुर्याजी पाटील व इतर.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज