दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
sangli education news : अॅकॅडमीच्या नावाखाली पालकांची लुबाडणूक सांगली, कोल्हापूरमध्ये अॅकॅडमीचे पेव फुटले : 21 व्या शतकात आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अॅकॅडमींची पेव फुटले आहे. या अॅकॅडमींच्या फीमुळे पालकांना घाम फुटला असून, सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्याची भिती निर्माण होत आहे.
sangli education news : अॅकॅडमीच्या नावाखाली पालकांची लुबाडणूक सांगली, कोल्हापूरमध्ये अॅकॅडमीचे पेव फुटले
एकीकडे राज्य सरकार नव्या कॉलेज, शाळांना मान्यता देण्याचे बंद केले आहेत. आहे त्या शिक्षकांना पगार वेळेत होईनासे झाले आहेत. त्यावर पर्याय म्हणून बर्यापैकी शिक्षण संस्थांनी अॅकॅडमी हा नवीन फंडा शोधून काढला आहे. अकरावी आणि बारावी या दोन वर्षाचे शिक्षण या अॅकॅडमीत दिले जाते. शहरातील कोणतीतरी मोठी इमारत भाड्याने घ्यायची. तेथे कॉलेज सुरू करून मोठमोठ्या जाहिराती करायच्या. समाजातील दहावीच्या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांचे घर गाठायचे आणि त्यांना आपल्या अॅकॅडमीत प्रवेश घेण्याचे आमिष दाखवायचे असा नवा खेळ सुरू झाला आहे.
सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे शिक्षणाबाबतीत भरपूर पुढे आहेत. शिवाजी विद्यापिठाच्या माध्यमातून अनेक कॉलेजने आपले नाव आपल्या कर्तृत्वावर मोठे केले आहेत. राजाराम कॉलेज, सांगली कॉलेज, विलिंग्डन कॉलेज, चिंतामनराव कॉलेज, मथुबाई गरवारे कॉलेज या महाविद्यालयांचा दरारा राज्यात सर्वत्र आहेत. मोठ मोठे नामांकित प्राचार्य या कॉलेजना लाभले होते. परंतु गेल्या दहा वर्षात या दोन जिल्ह्यात अॅकॅडमीचे पेव फुटल्याने या कॉलेजच्या विद्यार्थी संख्या कमालीची घटली आहे.
अॅकॅडमीकडून मोठमोठ्या शिक्षणाचे आमिष
या अॅकॅडमीकडून जेईई मेन्स आणि नीट अशा मोठमोठ्या परीक्षाचे आमिष दाखवले जाते. खोट्या निकालाचे शहरभर बॅनर लावून विद्यार्थ्यांंना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम अॅकॅडमीमार्फत सुरू आहे. सर्व अॅकॅडमीने मार्केटींग प्रतिनिधी नेमून, त्यांना गलेलठ्ठ पगार देवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचन्याचे काम दिले आहे.
कॉलेज एका ठिकाणी अॅडमिशन दुसर्याच ठिकाणी
ज्या ज्या ठिकाणी अॅकॅडमी सुरू आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांंना कोणतीच सुविधा मिळत नाहीत. एकेका अॅकॅडमीत 300 ते 400 विद्यार्थ्यांंना अॅडमिशन दिले जाते. त्यांची फि 70 हजारापासून पुढे आहेत. शहरातील नामांकित कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये यांचे रितसर अॅडमिशन घेतले जाते. परंतु त्या शाळा व कॉलेजमध्ये हे विद्यार्थी कधीच जात नाहीत. फक्त प्रॅक्टीकल परीक्षेला विद्यार्थ्यांना तेथे नेले जाते. शाळा व कॉलेजना अॅडमिशन मिळाल्याने त्यांचाही विद्यार्थ्यांंचा कोठा पूर्ण होतो. त्यामुळे तेही निर्धास्त आहेत.
विद्यार्थ्यांंच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर
सांगली, कोल्हापूरातील अॅकॅडमी भरवस्तीत इमारतीत भरवले जातात. येथे सुरक्षिततेची कोणतीही यंत्रणा नसते. एखाद्यावेळी जर आग लागली तर तेथे अग्निशमनची गाडी जावू शकत नाही. त्या इमारतीमध्ये महापालिकेच्या नियमानुसार अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही. महापालिकेचेही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे.
विद्यार्थ्यांंवर अभ्यासाचा दबाव
अकरावीला प्रवेश घेताना दहावीची परीक्षा व्हायच्या अगोदर मुलांवर दबाव टाकला जातो. त्या मुलाची मानसिकता नसली तरी पालक आणि अॅकॅडमीच्या संचालकांमुळे प्रवेश घ्यावा लागतो. याचा परिणाम मुलांवर होवून अनेक विद्यार्थी बारावीनंतर साईड बदलत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होत आहे. राजस्थानमधील कोटा शहरात ज्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केल्या त्या पध्दतीने यापुढे सांगली, कोल्हापुरातही होवू शकतात. याचा अगोदरच खबरदारी घेतली पाहिजे.
मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची भिती
अॅकॅडमीचे फी लाखात असल्याने मध्यमवर्गी विद्यार्थ्यांंना तेथे प्रवेश मिळत नाही. परिणाम जेथे मिळेल तेथे त्या शाळा, कॉलेजमध्ये त्याला अॅडमिशन घ्यावे लागते. परंतु तेथील शिक्षकही त्या अॅकॅडमीशी संलग्न असल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असून, मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून दूर फेकला जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
शिक्षकांची पात्रता तपासण्याची गरज
अॅकॅडमीमध्ये शिक्षण देण्यारे शिक्षक नवीनच असतात. बाहेरच्या राज्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यातील येथे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे हे तपासण्याची गरज आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.चंद्रकांत पाटील हे स्वत: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुर असलेला शिक्षणाचा हा बाजार त्यांनी मोडूना काढायला हवा, अशी मागणी होताना दिसून येत आहे. सांगलीत नशेखोरांविरोधात जसे टास्कफोर्स निर्माण केले आहे. त्या पध्दतीने या अॅकॅडमींच्या चौकशीसाठीही पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.