SANGLI FLOOD NEWS : कृष्णेचा पूर ओसरू लागला आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट : सांगलीकरांना मिळाला मोठा दिलासा : कृष्णेचा पूर ओसरू लागला
आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट
जिल्ह्यातील आणखी १ हजार २०० नागरिकांचे करण्यात आले स्थलांतर
सहा राज्यमार्ग, २१ प्रमुख जिल्हा व १९ ग्रामीण मार्ग अद्याप पाण्याखाली
SANGLI FLOOD NEWS : कृष्णेचा पूर ओसरू लागला आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत 24 तासात दीड फुटाची घट झाली असल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे वारणेचा धोका कायम आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आणखी 1 हजार 200 नागरिकांना स्थलांतर करण्यात आले.
तर 17 घरांची पडझड झाली. जिल्ह्यातील 6 राज्यमार्ग, 21 प्रमुख जिल्हा मार्ग व 19 ग्रामीण मार्ग अद्याप पाण्याखालीच आहेत. गेल्या आठ दिवसांपासून कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सांगली येथील आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 40.5 झाली होती.
कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. मात्र शनिवारी व रविवारी सांगलीकरांना पावसाने दिलासा दिला.
त्यामुळे नदीची पाणी पातळी शनिवारी स्थिर होती. कोयना धरणात 84.33 टीएमसी पाणीसाठा आहे. तर धरणातून 32 हजार 100 क्युसेक विसर्ग कायम आहे. चांदोली धरणात 29.53 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून 16 हजार 976 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तरी देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी सकाळपासून घट होत चालली आहे.
कराड येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात तीन फुटाने उतरली आहे.
तर बहे येथे दीड फुटाने, ताकारी येथे पाच फूट, भिलवडी येथे साडेतीन फूट तर सांगली येथील आयर्विन नदीवरील पुलाच्या पाण्याची पातळी दीड फुटाने उतरली आहे. सकाळपासून तासाला इंचाने पाणीपातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.