sangli gajya marne news : कुख्यात गुंड गजा मारणेची सांगली कारागृहात रवानगी : सांगली : पुण्यातील कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यावर मोक्का अन्यतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी थेट सांगलीच्या राजवाडा परिसरातील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मारणे याचा मुक्काम कारागृहात आहे.
sangli gajya marne news : कुख्यात गुंड गजा मारणेची सांगली कारागृहात रवानगी
सध्या कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने आधीच ओव्हर फ्लो आहे. त्यातच मारणे सारख्या गुंडांची सांगलीत रवानगी झाली आहे. कारागृहाची क्षमता 265 कैद्यांची असून सध्या 455 कैदी याठिकाणी आहेत. दरम्यान, मारणे याची रवानगी सांगली कारागृहात होताच सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. जिल्ह्या बाहेरून सुरक्षा कर्मचार्यांची तुकडी दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली. त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलिस क्शन मोडमध्ये आले होते. गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला. गजा मारणे हा कुख्यात गुंड असल्याने त्याचे विरोधक अनेक जण आहेत.
sangli-gajya-marne-news-notorious-gangster-gaja-marne-sent-to-sangli-jail
कारागृहात त्याला इतरांबरोबर ठेवले तर विरोधी टोळ्यांमधील गुंड त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते़ हे लक्षात घेऊन त्याला सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये ठेवले जाते. न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहात नेले होते. परंतु, तेथे अंडा सेलमध्ये जागा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे येरवडा कारागृहातील प्रशासनाने त्याला येथे ठेवण्यास जागा नसल्याचे सांगितले. त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलविण्यात आले. सध्या गजा मारणे याचा सांगली जिल्हा कारागृहात मुक्काम आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



