rajkiyalive

SANGLI : गणपती मंदिरासमोर तरूणाचा भोसकून खून

SANGLI : गणपती मंदिरासमोर तरूणाचा भोसकून खून : सांगली : चोवीस तास अतिशय वर्दळ आणि गजबजलेल्या संस्थानच्या गणेश मंदिराच्या दारात तरूणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. राहुल संजय साळुंखे (वय 19, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) असे मृत तरूणाचे नाव आहे. या हल्ल्यात साळुंखे याचा मित्र तेजस प्रकाश कारंडे (21, रा. जामवाडी) याच्या डोक्यात वार झाले असून गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. दर्शनासाठी मोठी गर्दी असता झालेल्या घटनेमुळे नागरीकांमध्ये घबराहट पसरली होती. पुर्वीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली आहेत.

SANGLI : गणपती मंदिरासमोर तरूणाचा भोसकून खून

एक गंभीर जखमी ; पुर्वीच्या वादातून कोयता, चाकूने हल्ला ; हल्लेखोर पसार.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज स्वामी समर्थ प्रकटदिनामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. मागील बाजूल दर्शनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. मृत राहुल साळुंखे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हे दोघे दुचाकी (एमएच 02 ए 8308) वरुन गणपती मंदिराजवळ आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी दुचाकी लावली.

त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असणारे दोघेजण त्याठिकाणी आले. क्षणात एका संशयिताने राहुल याच्या पोटात एकापाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने भोसकले. त्यावेळी त्याला वाचविण्यास आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला. जीवाच्या आकांताने राहुल हा मंदिरासमोर असणार्‍या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जागेवच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने चौकात गोंधळ उडाला होता. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पुर्वीच्या वादातूनच झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयिताच्या शोधासाठी तत्काळ रवाना झाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वान परिसरातच घुटमळेले.

मृतावर खुनी हल्ल्याचा गुन्हा

18 जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये मुलीच्या आईवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता. त्याचा गुन्हा मृत राहुल साळुंखे याच्यावर होता, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, संशयितांनी राहुल याच्या पोटात एकच वार केला. तो वार इतका वर्मी होता त्यात अतिरक्तस्त्रावाने राहुल याचा जागीच मृत्यू झाला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज