rajkiyalive

sangli grampanchat news : जिल्ह्यातील 696 गावांचे सरपंच आज ठरणार

दहा तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत

sangli grampanchat news : जिल्ह्यातील 696 गावांचे सरपंच आज ठरणार : जिल्ह्यात 2025 ते 2030 या कालावधीसाठी 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बुधवारी (दि. 23) सोडत काढली जाईल. दहा तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीत गावचा कारभारी कोण होणार? हे ठरणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.

sangli grampanchat news : जिल्ह्यातील 696 गावांचे सरपंच आज ठरणार

जिल्ह्यामधील 696 गा्रमपंचयतींसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरंपचपदाचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयामध्ये काढण्यात येणार आहे. सरपंच पदासाठी आरक्षण काढताना मागील आरक्षणाचा विचार केला जाईल. आरक्षण एकाच दिवशी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

तसेच सदरचे आरक्षण संबधित तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावतील तरतूदीनुसार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.

गेल्या दहा वर्षांतील आरक्षण वगळून अन्य प्रवर्गात संधी मिळणार आहे. तालुकानिहाय कोणत्या प्रवर्गाला किती, महिला किती याचा तक्ता तयार आहे. त्यानुसार तालुक्यात आरक्षण निश्चित केले जाईल. आरक्षण सोडतीत 50 टक्के महिला आरक्षण राहणार आहे. जत तालुक्यात सर्वाधिक 116 ग्रामपंचायतींचा समावेश आहे,

sangli-grampanchat-news-sangli-gram-panchayat-news-sarpanch-of-696-villages-in-the-district-will-be-elected-today

याशिवाय वाळवा तालुक्यात 94 याशिवाय शिराळा 91, तासगांव 68, मिरज 64, कवठेमहांकाळ 59, आटपाडी 53, कडेगाव 54, पलूस 33 ग्रामपंचायती आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज