जिल्ह्यात सर्दी, खोकला रुग्णांच्या सर्वेक्षणाचे आदेश
sangli health department hpmv news : जिल्ह्यात एचपीएमव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट : कोरोना महामारीप्रमाणे चीनमध्ये हयुमन (मानवी) मेटान्युमोव्हायरस (एचपीएमव्ही) या विषाणू पसरला असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकही संशयित रुग्ण नसून चीनमधील साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ग्रामीण भागातील सर्दी, खोकल्याचे रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
sangli health department hpmv news : जिल्ह्यात एचपीएमव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
सध्या चीनमध्ये हयुमन मेटान्युमोव्हायरसचा उद्रेक झाल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या नियोजनाखाली आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांची संयुक्त आढावा सभा घेऊन एचएमपीव्हीबाबत सर्वेक्षण व मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे.
हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात यावेत, असे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.
वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू मानवी मेटान्युमोव्हायरस अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही.
याबाबत आवश्यक दक्षता आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असून असा कुठलाही प्रकार आढळला तर जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करावे.
या बाबी टाळाव्यात
विषाणुपासून संरक्षण करण्यासाठी हस्तांदोलन टाळावे, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करु नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करु नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नये, अशा सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या.
विषाणुच्या संरक्षणासाठी ही दक्षता घ्या
* आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
* साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
*ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
*भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
*संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



