rajkiyalive

sangli islampur news : तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, 35 जण जखमी

sangli islampur news : तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, 35 जण जखमी : सांगली : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी ता. वाळवा येथे पुलावरून एसटी बस ओढ्यात कोसळली. या अपघातात 35 प्रवाशी जखमी झाले. जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवार (दि.27) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

sangli islampur news : तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, 35 जण जखमी

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दहिवडी डेपोची दहिवडी-जोतिबा एसटी बस क्र (चक 34 इढ 4203)ही जोतिबाकडे निघाली होती. तांदुळवाडी ता. वाळवा येथे गुरव पुलाजवळ बस येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. अपघातात 35 प्रवाशी तर चालक गंभीर जखमी आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली.

मात्र, बसमध्ये एकूण किती प्रवाशी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने सह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा सुरु आहे.

..अन्यथा मोठा अडथळा झाला असता
बस कोसळलेल्या ओढ्यामध्ये वारणा नदी वरून आणलेल्या पाण्याच्या पाईप आहेत. सकाळी लाईट गेल्यामुळे या पाईप मधून पाणी बंद होते. अन्यथा अपघातामुळे पायपा फुटून येथे पाण्याचा मोठा साठा झाला असता यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज