rajkiyalive

sangli jayashri patil news : मदनभाऊंनी दिले कार्यकर्त्यांना बळ; जयश्रीताईंना देतील का त्याचे फळ?

sangli jayashri patil news : मदनभाऊंनी दिले कार्यकर्त्यांना बळ; जयश्रीताईंना देतील का त्याचे फळ? : सांगली शहरात नव्हे तर सांगली जिल्ह्यात स्व. मदनभाऊ पाटील यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते. अनेकांना बळ दिले, राजकारण व समाजकारणात अनेक जणांना ताकद दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महापौर, बाजार समिती अध्यक्ष, पंचायत समिती सभापतीसह विविध पदावर कार्यकर्ते पोहचले. याच कार्यकर्त्यांच्या बळावर आता स्व. मदनभाऊंच्या पत्नी जयश्री पाटील निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरल्या आहेत. त्यांना याचे फळ मिळेल का? याची चर्चा सांगली विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे सुरू झाली आहे.

sangli jayashri patil news : मदनभाऊंनी दिले कार्यकर्त्यांना बळ; जयश्रीताईंना देतील का त्याचे फळ?

सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील घराण्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दादा घराण्यातील व्यक्तिंनी अनेक पदे भूषविली. जिल्ह्यासाठी विकासासाठी हातभार लावला. त्यापैकी एक म्हणजे स्व. मदनभाऊ पाटील. महामंडळाचे अध्यक्ष, आमदार, आमदार खासदार, मंत्री यासह विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. हे करत असताना सांगली शहराच्या विकासासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे. काही अपवाद वगळता महापालिकेत स्व.मदनाभाऊ पाटील यांची एकहाती सत्ता असायची. या काळात अनेक कार्यकर्ते मोठे झाले. गरिब, तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या पदाची संधी दिली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह विविध समित्यांच्या सभापतीपदी अनेक जण विराजमान झाले. त्यांना ताकद देण्याचे काम भाऊंनी केले.

सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी संस्थांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदावर काम करण्याची संधी त्यांनी दिली. हे करत असताना शहरातील विकासावर देखील त्यांनी भर दिला. शहरातील अनेक खोकी रस्त्यांवर वसली होती. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी व्यापारी संकुल उभे केले. त्यावर अनेक गोरगरिब व्यवसायिक मोठ्या थाटात आपला व्यवसाय करत आहेत.

सांगली व कुपवाड शहराला वारणेचे पाणी मिळण्याचा त्यांचा हट्ट होता.

तो हट्ट देखील त्यांनी पूर्ण करून तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव जगताप यांच्या हस्ते वारणा उद्भव पाणी योजनेचा शुभारंभ झाला. पण 2008 ला सत्ता बदल झाल्याने सांगलीकरांना वारणेचे पाणी मिळाले नाही. सांगली शहराला शेरीनाल्याची मोठी समस्या होती. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने धुळगाव शेरीनाला योजना मंजूर करून आणली. सांगलीचे सांडपाणी उचलून थेट धुळगाव येथे नेणारी योजना पूर्णत्वाकडे केली आहे. यासह शहरातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहे.

भाऊंच्या निधनानंतर आता जयश्री पाटील यांनी गेल्या नऊ वर्षांपासून कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत.

कोणतेही मोठे पद नसताना त्यांनी कार्यकर्त्यांना जोपासले आहे. 2019 च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही. तरी देखील नाराज झाल्या नाहीत. पक्षासाठी त्यांनी काम सुरू ठेवले आहे. पण 2024 च्या निवडणुकीत पुन्हा काँगे्रेस पक्षाने त्यांना डावलले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी अपक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यावर स्व. मदनभाऊ पाटील यांची टीम व वसंतदादा पाटील घराणे आज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. या ताकदीवर त्या विधानसभेच्या निवडणूक मैदानात आहेत. काही सामाजिक संघटना, संस्थांबरोबर जनरेटाची मोठी ताकद त्यांना मिळत आहे.

जयश्रीताईंचे नऊ वर्षे निस्वार्थी काम…

स्व.मदनभाऊंच्या निधनानंतर जयश्री पाटील यांनी राजकारणात काम सुरू केले आहे. या काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक यासह अनेक संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेसची मंडळी निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला. निस्वार्थीपणे त्यांनी काँग्रेसचे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची टीम त्यांच्या प्रचारात सक्रीय आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज