rajkiyalive

सांगली जिल्हा परिषद : आरोग्य सेवक 10 जून तर कंत्राटी ग्रामसेवकची 16 जुनपासून परीक्षा

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषद : आरोग्य सेवक 10 जून तर कंत्राटी ग्रामसेवकची 16 जुनपासून परीक्षा : सांगली ः जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार संवर्गाची परीक्षा रखडली होती. निवडणुकीची धामधूम संपताच उर्वरित आरोग्य सेवक पुरुष व महिला तसेच ग्रामसेवक पदाच्या संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. चार संवर्गासाठी वेगवेगळ्या शिफटमध्ये परीक्षा होईल. आरोग्य सेवक पदासाठी 10 जूनपासून तर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 16 जुनपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सांगली जिल्हा परिषद : आरोग्य सेवक 10 जून तर कंत्राटी ग्रामसेवकची 16 जुनपासून परीक्षा

जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकर भरतीचा चार वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता. राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची निवड झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 754 जागांसाठी 34 हजार 743 उमेदवारांचे अर्ज केले होते. आत्तपर्यंत संबंधित कंपनीकडून चौदा संवर्गाची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चला लागू झाली होती, सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. अद्यापही आचारसंहिता लागू असली तरी 4 जुनला निकाल जाहीर होणार आहे, त्यामुळे उर्वरित संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 16 ते 21 जून या कालावधीत वेगवेगळ्या शिफटमध्ये घेतली जाणार आहे.

आरोग्य सेवक महिला 40 टक्के संवर्गासाठी 10 ते 12 जून, आरोग्य सेवक पुरुष 50 टक्केमधून हंगामी फवारणी 13 ते 15 जून, आरोग्य सेवक महिला पदासाठी 16 जुनला लेखी परीक्षा होईल. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 16 ते 21 जून या कालावधीत वेगवेगळ्या शिफटमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेची वेळ संबंधीत परिक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर नमूद करण्यात येणार आहे. परिक्षार्थीना कोणत्याही प्रकारची शंका असल्यास सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्याशी संपर्क साधावा.

सन 2023 ची सरळसेवा भरती परीक्षा ही पारदर्शक पध्दतीने होत असून परिक्षार्थी यांनी कोणाच्याही अमिषाला व दबावाला बळू पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज