सांगली :
SANGLI : जिल्हा पोलीस दलात तीन दिवस भरती प्रक्रिया : वशिलेबाजी खपवून घेणार नाही : अधीक्षक संदीप घुगे. : जिल्हा पोलिस दलाकडील शिपाई व चालक पदाच्या 40 जागांसाठी 1 हजार 750 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलिस भरतीची प्रक्रिया 19 जूनपासून तीन दिवस मुख्यालयातील कवायत मैदानावर होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी दिली. ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जाणार असून कुठलीही वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
SANGLI : जिल्हा पोलीस दलात तीन दिवस भरती प्रक्रिया : वशिलेबाजी खपवून घेणार नाही : अधीक्षक संदीप घुगे.
सांगली पोलिस दलाकडील सर्वसाधारण पोलिस शिपाई पदाच्या 27 तर चालक शिपाई पदाच्या 13 अशा एकूण 40 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. पोलिस भरतीसाठी 1 हजार 750 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी आता बुधवार दि. 19 ते 21 जून दरम्यान पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पहिल्या दिवशी 813, दुसर्यादिवशी 732 तर तिसर्यादिवशी 205 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, असेही घुगे म्हणाले. धावणे, गोळाफेक या मैदानी चाचण्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या नियंत्रणात होणार आहेत. त्यावर पोलिस उपअधिक्षकांचा वॉच राहणार आहे. भरती प्रक्रियेतील उमेदवारांना काही शंका असेल तर जागेवर त्याचे निरसन केले जाईल, असेही घुगे यांनी सांगितले.
व्हिडीओ चित्रिकरण, सीसीटीव्हीचा असणार वॉच…
पोलिस भरती प्रक्रियेत बोगसगिरीला चाप लावण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. शिवाय सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. पात्र उमेदवारांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाईल. त्यानंतर कागदपत्रांची छाननी होईल. मैदानी परिक्षेला एक उमेदवार आणि लेखी परिक्षाला दुसर्याच उमेदवार, असे होऊ नये, यासाठी फिंगरप्रिंट घेतले जाणार आहे.
वशीलेबाजी खपवून घेणार नाही : संदीप घुगे..
पोलिस भरतीस पात्र उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. गुणवत्तेवर उमेदवारीची भरती केली जाणार आहे. वशीलेबाजी खपवून घेतली जाणार नाही. परीक्षा प्रक्रियेला गालबोट लागू नये, याची दक्षता घेतली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जाईल. बेकायदेशीर गोष्टी केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस अधिक्षक घुगे यांनी दिला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.