rajkiyalive

SANGLI जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.66 टक्के

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.66 टक्के : सांगली ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 96.66 टक्के लागला. उत्तीर्णामध्ये मुलींचे प्रमाण सर्वांधिक 97.89 टक्के आहे. यंदाही दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेतर यंदा दहावीच्या निकालात 0.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 289 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.

SANGLI जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.66 टक्के

उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी, 289 शाळांचा शंभर टक्के निकाल

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावी निकालाबाबत उत्सुकता होती. सोमवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला. काही भागात नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांसह पालक निकालाची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल करत होते. अनेकांनी स्टेटस् ठेवला

कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 98.20 टक्के लागला आहे. सातारा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकविला आहे. या जिल्ह्याची टक्केवारी 97.19 टक्के आहे. सांगलीचा निकाल 96.66 टक्के निकाल लागल्याने विभागात तिसरे स्थान मिळाले. गेल्या वर्षी 96.08 टक्के लागला होता. यंदा 0.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या 652 शाळां आहेत. या शाळेतील 38 हजार 66 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी 37 हजार 815 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 36 हजार 554 जण उत्तीर्ण झाले. केवळ 1 हजार 262 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

SANGLI जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.66 टक्के : उत्तीर्णमध्ये मुलींचे प्रमाण 97. 89 टक्के

गेल्या आठवड्यात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती. दहावीच्या निकालातही मुलींच आघाडी घेतली आहे. 17 हजार 679 मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी 17 हजार 546 मुलींनी परीक्षा दिली. त्यामधून 17 हजार 176 मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे. जिल्ह्यातील 20 हजार 387 मुलांनी परीक्षेचा अर्ज केला होता. त्यापैकी 20 हजार 269 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 19 हजार 378 मुले उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण 95.60 टक्के आहे. मुलांच्यापेक्षा मुलींच्या उत्तीर्णचे प्रमाणे 2.29 टक्क्यांनी जास्त आहे.

पुर्नपरीक्षार्थींचा निकाल 56.86 टक्के

जिल्ह्यात 620 पुर्नपरीक्षार्थीची नोंदणी झाली होती, त्यापैकी 612 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 348 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 56.86 टक्के आहे.

जिल्ह्यात 289 शाळांचा निकाल शंभर टक्के

जिल्ह्यातील 289 माध्यमिक शाळांचा दहावीच्या परीक्षेचा निकाला 100 टक्के लागला आहे. जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील 40 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यानंतर महापालिका क्षेत्र 37, मिरज 34जत 33, शिराळा 26, कडेगाव 22, विटा 24, पलूस 24, आटपाडी 20, कवठेमहांकाळ 16 आणि तासगाव तालुक्यातील 13 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
गुण पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत मंगळवार दि. 28 मे ते 11 जूनपर्यत आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय शुल्क 50 रुपये ऑनलाईनच्या माध्यतातून बोर्डाकडे जमा करावे लागणार आहे, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली.

तालुकानिहाय निकाल
कडेगाव 98.94
पलूस 98.20
शिराळा 98.17
खानापूर 97.17
आटपाडी 97.05
वाळवा 96.77
क.महांकाळ 96.58
तासगाव 96.47
मिरज 96.41
जत 96.13
सांगली 95.46
एकूण 96.66

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज