rajkiyalive

सांगली जिल्ह्यात 3 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा :

राज्यभरातून 1 हजार 700 पोलिस, 1 हजार 400 होमगार्ड मागवले.

सांगली जिल्ह्यात 3 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा : : सांगली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. प्रचार आणि मतदान कामासाठी राज्यभरातून मोठा फौजफाटा मागवला आहे. बाहेरील जिल्ह्यांतून 1700 पोलिस कर्मचारी आणि 1400 होमगार्ड बोलावण्यात आले आहेत. जिल्ह्यात आता एकूण पोलिसांची संख्या 3 हजार 800 वर पोचली आहे.

सांगली जिल्ह्यात 3 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा :

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यात सांगली मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आहे. शहरासह जिल्ह्यातील सीमांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याचबरोबर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 24 तास पोलिस कार्यरत आहेत. जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, आंध्रप्रदेश पोलिस बल दल यांच्या प्रत्येकी 100 च्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात 2100 पोलिस कार्यरत आहेत. त्यात इतर जिल्ह्यांतून 1700 पोलिस बोलवण्यात आले आहेत. जिल्ह्यात 750 होमगार्ड असून, 1400 जणांना बोलावण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी दिली.

लाखोंची रोकड जप्त..

ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. गेल्या 15 दिवसांत 61 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात 13 लाख 96 हजारांची रोकड असून 30 लाख 87 हजारांचे दागिने तर, 17 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यावेळी समाज माध्यमावरील आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो, व्हिडिओवर आमची नजर आहे. काही आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग, सांगली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज