शिराळा / सलगरे प्रतिनिधी
SANGLI : सांगली जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू : जिल्ह्यात मंगळवारी वादळी वारे आणि पावसाने वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील गिरजवडे आणि मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडीत ही घटना घडली.
SANGLI : सांगली जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
गिरजवडे (ता. शिराळा) येथे मंगळवार, दि. 21 रोजी झालेल्या वादळी पावसामुळे लक्ष्मण सोपान शेळके (वय 60) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण शेळके ( वय 58) हे तळ्याचा डोंगर याठिकाणी ते गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास वादळी वार्या वीजांसह पावसास सुरूवात झाली. त्यावेळी लक्ष्मण शेळके यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक सून असा परिवार आहे.
पाऊस गेल्यानंतर लक्ष्मण शेळके यांची जनावरे मोकळीच डोंगरावरून खाली आले.
जनावरांच्या राखण करण्यासाठी गेलेले लक्ष्मण शेळके जनावरांच्या आजूबाजूला दिसले नाहीत. डोंगरावर शोध घेण्यासाठी गेले असता लक्ष्मण शेळके डोंगरावरती निपचिप पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटनेचा पंचनामा करणेसाठी घटनास्थळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, प्रशिक्षनार्थी तहसीलदार संतोष आठारे, मंडलाधिकारी सोनिल गायकवाड, तलाठी लहूदास चौधरी, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक आनंदा जाधव, पोलिस काँन्स्टेबल सचिन कांबळे, युवराज जगदाळे भेट दिली.
चाबुकस्वारवाडीत एक ठार दोन जखमी
दरम्यान मिरज तालुक्यातील चाबुकस्वाडी ते शिरूर या रस्त्यावरील कारनवार यांच्या शेतात वीज कोसळून एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. शेतामध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असून काम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वार्याने वार्यासह पावसाने हजेरी लावली.
पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणार्या कामगारांनी जवळच असणार्या एका पडक्या इमारती शेजारील शौचालयाचा आधार घेत यामध्ये ते उभे राहिले यामध्ये सुभाष गोविंद नाईक वय 45 खटाव ता. मिरज, सहादेव महादेव धोतरे वय 22 रा. बीड, संदिप जगन पवार वय 22 रा.बीड हे उभे राहिले मात्र शौचालयावरच कोसळुन खटावचे संदीप नाईक हे जागीच गतप्राण झाले तर अन्य दोघे जखमी झाले.
चाबुकस्वारवाडीचे पोलीस पाटील उद्धव खोत, तलाठी कल्पना आंबेकर, कोतवाल सिध्दु लोहार यांच्यासह कवठेमहांकाळ पोलिसांनी धाव घेतली. यामध्ये दोन जखमींपैकी एक जखमी गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे कवठेमंकाळ पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट देऊन अधिकार्यांची पाहणी सुरू होती.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



