rajkiyalive

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले

30 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळेना, दीड वर्षापासून प्रतिक्षाच

जनप्रवास । अनिल कदम

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले सांगली ः महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेले जिल्ह्यातील 30 हजार नियमित कर्जदार तब्बल दीड वर्षापासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांची सुमारे 100 कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे लटकली आहे. आत्तापर्यंत प्रशासनाकडून शेतकर्‍यांच्या सात याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये 75 हजार 106 शेतकर्‍यांचा समावेश आहे. पात्र शेतकर्‍यांचे आधार लिंकींग पूर्ण होवूनही शासनाकडून निधी वर्ग करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले : खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असताना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याने शेतकर्‍यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 त्यामध्ये शेतकर्‍यांचे 2 लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात आले. मात्र थकबाकीदारांना कर्जमाफी देताना शासनाने नियमित कर्ज परत फेड करणार्‍या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याने राज्याच्या विविध भागात शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते.

दुसर्‍या टप्प्यात शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेची घोषणा केली.

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची वाढती नाराजी लक्षात घेत योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेची घोषणा केली. यासाठी शासनाच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. मात्र अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले. राज्यात सत्तांतर होवून शिंदे-फडणवीस सरकारने योजनेची अमंलबजवणी सुरु केली.

नियमित कर्ज भरणार्‍या जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 795 पात्र शेतकर्‍यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यातील 62 हजार 642 शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकर्‍यांना दीड वर्षापूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला. राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील नियमित कर्जदारांची दुसरी यादी डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केली होती. त्यानंतर तीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यामध्ये जिल्ह्यातील नाममात्र शेतकर्‍यांची संख्या होती.

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले: जिल्ह्यातील 25 हजार 102 शेतकर्‍यांची दुसरी यादी आहे.

उर्वरित तीन याद्यामध्ये अवघे एक हजार शेतकरी आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 24 हजार व अन्य बँकाकडील 2 हजार 39 शेतकर्यांचा समावेश आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी 61 हजार 856 शेतकर्‍यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी 56 हजार 127 शेतकर्‍यांना अनुदानाचे 205 कोटी रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले. पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले तसेच तक्रारी असलेले 6 हजार शेतकर्‍यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. पहिल्या यादीतील प्रलंबित शेतकर्‍यांच्या तक्रारीवर तहसिलदार आणि तालुका उपनिबंधकांनी सुनावणी घेतली आहे. त्या शेतकर्‍यांच्या तक्रारीही निकालात काढण्यात आल्या आहेत. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने सहकार विभागाला कळविले आहे.

पहिल्या यादीतील 6 हजार दुसर्‍या यादीतील 26 शेतकर्‍याचे आधार लिंकींग पूर्ण झाले आहे.

दरम्यान पहिल्या यादीतील आधार लिंक पूर्ण होताच प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. दुसरी यादी प्रसिद्ध होवून दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शेतकरी आणि संबंधित बँकांनी त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतू पाच यादीतील जिल्ह्यातील 30 हजार शेतकर्‍यांची सुमारे 100 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान लटकले आहे. शासनाकडून अनुदान वर्ग करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पात्र शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येते.

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले : तर अनुदानासाठी पुन्हा आंदोलन – महेश खराडे

सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे प्रोत्साहन अनुदान देण्यास दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. परंतु नियमित कर्जदारांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा न केल्यास संघटनेच्यावतीने पुन्हा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

नियमित कर्जदारांची माहिती
शेतकरी यादी अपलोड 1,60,795
पहिली यादी प्रसिद्ध 62,642
दुसरी यादी प्रसिद्ध 25,102
तिसरी यादी प्रसिद्ध 523
चौथी यादी 332
अनुदान जमा शेतकरी 75,106
अनुदान मिळालेली रक्कम 205 कोटी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज