अर्जांच्या छानणीला सुरुवात, निकषांच्या कात्रीमुळे लाभावर पाणी सोडावे लागणार
ladki bahin : सांगली जिल्ह्यात 2 लाखांवर लाडक्या बहिणी होणार अपात्र : अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता महिला बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी सुरु करण्यात आली आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जात आहेत. निकषांच्या कात्रीमुळे जिल्ह्यातील सुमारे 2 लाखांवर लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे सुमारे 25 टक्के महिलांना लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
ladki bahin : सांगली जिल्ह्यात 2 लाखांवर लाडक्या बहिणी होणार अपात्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांसाठी 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी या दोन प्रमुख अटी होत्या. राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी 7 लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी 47 असल्याच जाहीर केले. तसेच आयकर नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे
महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून 2 कोटी 34 लाख लाभार्थीपैकी 15 ते 20 टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या 923 महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र झाले आहेत.
जिल्ह्यातील 7 लाख 812 हजार 160 महिलांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी 7 लाख 10 हजार 772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार 580 महिलांचे अर्ज अंशतः अपात्र ठरले आहेत. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या 923 महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र झाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान झाले आहे. जिल्ह्यातही आतापर्यंत महिलांच्या खात्यावर सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा झाली आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
त्याचवेळी निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या.
त्यामुळे अर्जाची छाननी सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेणार्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. खर्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी, या उद्देशाने अर्जाची छाननी केली जात आहे. अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील, अशी माहिती अधिकार्यांच्यावतीने देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 7 लाख 81 हजार लाडक्या बहिणींचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाच्यावतीने लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक महिला लाभार्थी निकषांच्या कात्रीत बसत नसल्याने त्या अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 25 टक्के महिलांना लाभावर पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र आहे.
लाडकी बहिण’ची पडताळणी अशी सुरु
– उत्पन्नाचा दाखला
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणे आवश्यक आहे. त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
-आयकर प्रमाणपत्र
लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावा, अशी अट आहे. त्यामुळे त्याची छाननी केलेली जाईल.
– सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन
जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
– शेती
पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
– कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा
एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



