rajkiyalive

SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील

SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही

SANGLI LOKSABHA CONGRESS :  निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील

SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील
सांगली: वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती व विचाराचे आम्ही आहोत, त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. पण या निवडणुकीत खासदारांचा पराभव निश्चित असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

जनप्रवास । प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी कॉँग्रेस कमिटी येथे झाला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी महापौर किशोर जामदार, सिकंदर जमादार, पी. एल. रजपूत, उदय पवार यांच्यासह मनपा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यात वातावरण बदलत चालले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत काँगे्रेसला चांगले यश मिळाले. लोकसभा मतदारसंघातील तीन तालुके बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. काँग्रेस आघाडीला 75 तर भाजप आघाडीला केवळ 25 टक्के मते मिळाली आहेत. देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खासदार व सांगली, मिरजेतील दोन्ही आमदार देखील भाजपचे आहेत. खांद्यावर हात टाकून गोड बोलवून फसविण्याचे काम खासदारांकडून सुरू आहे. मात्र हे आता चालणार नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाणार असल्याचा खोटा प्रचाार सुरू झाला आहे. आम्ही असा विचार कधी करणार पण नाही. कधीही भाजपच्या नेत्यांना भेटलो नाही, किंवा माझ्यावतीने कोणी भेटलो नाही.

 

दादांचा विचार भाजपच्या विचारांपेक्षा मोठे आहेत.

आमच्यावर त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे भाजपचा कधीही विचार आमच्याकडून होणार नाही. काँग्रेस पक्षाने आम्हाला भरपूर दिले आहे. आता पक्षाला अडचणीच्या काळात आमची गरज आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसबरोबरच आहे. खासदार-आमदार व्हावे, असे आमचे काही नाही. दादा घराणे नेहमी जनतेचे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लढवैय्या नेता असल्यामुळे संघर्ष करण्याचा माझा स्वभाव आहे. पक्षात आणि घरात देखील संघर्ष होत होता. पण आता तसे होणार नाही. घरात बैठक घेऊनच आम्ही निर्णय घेत आहे. आ. विश्वजीत कदम यांच्याबरोबर देखील आता वाद उरले नाहीत. यापुढे एकत्रित भाजपच्या विचाराशी आम्ही लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदारांना उमेदवारी मिळते की नाही? हे त्यांनी पाहणे आवश्यक आहे.

त्यांनी दुसर्‍याची काळजी करू नये. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. दोनचे चार होती. पण या निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही. महापालिकेत दहा वर्षे कधी विकासासाठी गेला नाही. पण आता कोणत्या तर एका खासगी जागेचे आरक्षण उठविण्यासाठी महापालिकेत बैठक घेतली आहे. नुकताच त्यांनी वाढदिवस साजरा केला, पण या वाढदिवसाला एकाही माजी नगरसेवकाने त्यांचे डिजीटल लावले नाही. यावरून त्यांनी ओळखून घ्यावे, असा टोला त्यांनी लगाविला. तर येणार्‍या निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यासारखे आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन विशाल पाटील यांनी केले.

 

 

प्रस्ताविक माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांनी केले. यावेळी सुभाष खोत, संतोष पाटील, अभिजीत भोसले, किशोर जामदार, सिकंदर जमादार, उदय पवार, संजय मेंढे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी करण जामदार, विजय धुळूबुळू, शशिकांत नागे, अमर निंबाळकर, अमित पाटील, राजेश नाईक, दिलीप पाटील, बिपीन कदम, कुमार पाटील, शुभांगी साळुंखे, रोहिणी पाटील, आरती वळवडे आदी उपस्थित होते.

विशाल पाटीलच लोकसभेचे उमेदवार: जयश्रीताई पाटील

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काहीजण अफवा पसरवत आहेत. पण काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटीलच आहेत. त्यांनी आता लोकांचा अभ्यास करावा. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास निश्चितच विजय आपला होईल. कार्यकर्त्यांनी आता अफवांकडे लक्ष न देता कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज