जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरु
सौरभ उत्तरे, जनप्रवास,
येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे प्रशासन निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. सांगली जिल्ह्यासाठी निवडणूक विभागाकडून सुमारे साडे पाच हजार ईव्हीएम (मतदान यंत्र) दाखल झाली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या मतदान यंत्रांची प्राथमिक स्तरावरील तपासणी करण्यात आली आहे. मिरज येथील शासकीय गोदामामध्ये पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
तब्बल दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत.
तब्बल दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होत आहे, परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. या संस्थांमध्ये प्रशासकराज आहे. गत महिन्यात निवडणूक मतदार यादी पुर्नरिक्षणचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची चर्चा पुन्हा सुरु होती. न्यायालयाच्या निर्णय प्रलंबित असल्याने इच्छुकांचा भ्रमनिराश झाला आहे. या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीची लगभग सुरु झाली आहे.
जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नव्या एम-3 प्रकारच्या ईव्हीएम मशिनची तपासणी करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुका आठ- नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या येणार्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून, जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नव्या एम-3 प्रकारच्या ईव्हीएम मशिनची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये बॅलेट युनिट 5 हजार 670 उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये कंट्रोल युनिट 3 हजार 202 मतदान यंत्र आहेत. या मतदान यंत्राची सुरक्षित व्यवस्था मालगांव गोदाम येथे करण्यात आली आहे.
नवीन मतदार नोंदणी आणि मतदारयादी बिनचूक करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. नवीन मतदार नोंदणी आणि मतदारयादी बिनचूक करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचार्यांवर निवडणूक सोडून इतर विभागांची कामे लादू नका, असे आदेश पूर्वीच आयोगाने दिले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडे मतदान यंत्र दाखल झाले आहेत. अद्याप निवडणुकीला अवधी असला तरी या मतदान यंत्राची तपासणी बेंगलोर येथील यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे हे मतदान यंत्र नेमक्या कोणत्या निवडणुकीसाठी आली आहेत, असा तर्कवितर्क लढविला जात आहे.
मतदान यंत्र मिरज येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत.
आधी लोकसभा की लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेली मतदान यंत्र मिरज येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून चोवीस तास पोलीसांचा खडा पहारा असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून सांगली जिल्हयासाठी मतदान यंत्र पाठविण्यात आली आहेत. उपलब्ध झालेल्या मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून मिरजेतील शासकीय गोदामामध्ये सशस्त्र बंदोबस्तात यंत्र ठेवण्यात आली असल्याचे प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



