जिल्ह्यातील 1 हजार 787 शेतकर्यांच्या बँक खात्यावर मदत जमा
sangli local news : अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचे आले 1.77 कोटी: अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली होती. सन 2022 ते 2024 या कालावधीतील राज्यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे.
sangli local news : अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचे आले 1.77 कोटी
आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी, पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस 2022-2023, व 2023-2024, अवेळी पाऊस, अतिवृष्टी 2023-2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे.
त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना 99 लाख 62 हजार 37 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.
2022 ते 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शेतकर्यांना पूर, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला होता. या कालावधीत शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु निधीच्या कमतरतेअभावी निधी मिळाला नव्हता. गेल्या तीन वर्षापासून नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना अखेर मदत मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



