सहकार विभागाचे सहकार ते समृद्धी अभियान
sangli local news : सांगली जिल्ह्यात 17 सोसायटी तर 19 दूध संस्थांना मंजुरी : केंद्र सरकारच्या संकल्पनेतून सहकार से समृध्दी अंतर्गत बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्था, दुग्ध व्यवासाय व मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या स्थापनेद्वारे सर्व ग्रामपंचायत व गावांना समाविष्ट करण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत जिल्ह्यत नव्याने नोंदलेल्या 39 संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामध्ये कृषी पतपुरवठा करण्यासाठी 17 सोसायटी आणि 19 दूध संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे.
sangli local news : सांगली जिल्ह्यात 17 सोसायटी तर 19 दूध संस्थांना मंजुरी
दिल्ली येथे केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये सहकार से समृध्दी अंतर्गत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालयात झाला. त्यावेळी 39 संस्थांना प्रमाणपत्रे जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालिका श्रीमती अनिता सगरे, संचालक बी. एस. पाटील यांच्याहस्ते देण्यात आली.
जिल्ह्यात दहा हजार प्राथमिक सहकारी संस्था स्थापन झाल्या असून त्यापैकी सहा हजार संस्था दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहे.यावेळी कार्यक्रमामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या 17 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, 19 दुग्ध संस्था व 3 मत्स्य संस्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. देशपातळीवर झालेल्या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. तसेच केंद्र शासानाच्या सहकारी संस्थांसाठी सुरु केलेल्या संगणकीकरण योजना, जनऔषधी योजना, सीएससी सेंटर, गोदाम योजना, पीएमकेएसके अशा नवीन योजनांची माहिती देणेत आली.
प्रास्ताविक जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले. नाबार्डचे जिल्हा प्रबंधक निलेश चौधरी, झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, तहसिलदार अनंत कुंभार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, सहाय्यक निबंधक (दुग्ध) दिपा खांडेकर, सहाय्यक निबंधक अनिल कोळी, संभाजी पाटील, विलास कोळेकर, रोहित भगरे आदी उपस्थित होते. बिपीन मोहिते यांनी सुत्रसंचालन तर तासगाव सहायक निबंधक रंजना बारहाते यांनी आभार मानले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.